शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

‘कॉफी विथ पोलीस’ उपक्रमातून विद्यार्थी झाले ‘बोलके’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 14:52 IST

विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया, सुरक्षितता, स्पर्धा परीक्षा यासह अन्य विषयांवर पोलिसांशी मनमोकळा संवाद साधला.

ठळक मुद्देपोलीस उपनिरीक्षक जायभाये यांनी सुरूवातीलाच पोलिसांविषयीची असलेली भीती दूर करून या संवाद प्रक्रियेत खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांनीदेखील तेवढ्याच हिरीरीने उत्तरे दिले तसेच शंका, प्रश्न उपस्थित करून शंकांचे निरसन करून घेतले. प्रास्ताविक शिक्षक महेश उगले यांनी तर आभार शिक्षक  मोहन चौधरी यांनी मानले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - एरव्ही पोलीस प्रशासन म्हटले की विद्यार्थ्यांच्या मनात विविध शंका, प्रश्न निर्माण होण्याबरोबरच थोडीशी भीतीही असतेच. पोलिसांप्रतीची भीती घालवून ‘पोलीस-विद्यार्थी’ नाते अधिक वृद्धींगत करण्यासाठी, संवादाची दरी कमी करण्यासाठी पार्डी टकमोर येथील पारेश्वर विद्यालयाने १८ जुलै ‘कॉफी विथ पोलीस’ हा उपक्रम राबविला. यावेळी विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया, सुरक्षितता, स्पर्धा परीक्षा यासह अन्य विषयांवर पोलिसांशी मनमोकळा संवाद साधला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बाबाराव राठोड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक अशोक जायभाये, सेवानिवृत्त प्राचार्य सोपान कांबळे, रवी जवंजाळ आदींची उपस्थिती होती. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जायभाये यांनी सुरूवातीलाच पोलिसांविषयीची असलेली भीती दूर करून या संवाद प्रक्रियेत खेळीमेळीचे वातावरण निर्माण केले. विविध प्रश्नांवर विद्यार्थ्यांना ‘बोलते’ केल्याने विद्यार्थ्यांनीदेखील तेवढ्याच हिरीरीने उत्तरे दिले तसेच शंका, प्रश्न उपस्थित करून शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांची सुरक्षा, निर्भया पथक, सोशल मीडिया, आत्मविश्वास, भिती दूर करणे, स्पर्धा परीक्षा आदी विषयांवर हा संवाद चालला. विशेषत: सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, निर्भया पथक, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक हरीष चौधरी यांनी, प्रास्ताविक शिक्षक महेश उगले यांनी तर आभार शिक्षक  मोहन चौधरी यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस