शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात महा ई- सेवा केंद्र संचालक पाळणार बंद   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 12:33 IST

केंद्रातील किमती साहित्याची तोडफोड केल्याचा राज्यभरातील महा ई-सेवा केंद्र संचालकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमाहिती महा ई-सेवा केंद्र संचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रभाकर भेंडेकर यांनी दिली आहे. या संदर्भात विविध संघटनांकडून प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम:  बुलढाणा जिल्ह्यातील डोनगाव ता. मेहकर येथील महा ई सेवा केंद्र चालकांवर हल्ला करून केंद्रातील किमती साहित्याची तोडफोड केल्याचा राज्यभरातील महा ई-सेवा केंद्र संचालकांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्याचा निर्णय संघटनांनी घेतला असल्याची माहिती महा ई-सेवा केंद्र संचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रभाकर भेंडेकर यांनी दिली आहे. या संदर्भात विविध संघटनांकडून प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घडलेली घटना म्हणजे सेवा हमी कायद्याची प्रभावी आणि वेळेच्या आत अंमलबजावणी करण्यात प्रशासन अक्षम ठरल्यामुळे संतप्त  अर्जदाराने स्थानिक गावगुंडांच्या मदतीने केलेला हल्ला होय, यात प्रशासनातील अधिकारी आणि हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी  राज्यातील सर्व महा ई सेवा केंद्र(आपले सरकार सेवा केंद्र) एक दिवसीय लाक्षणिक बंद पाळतील असे महा ई-सेवा केंद्र संचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष भेंडेकर यांनी सांगितले. एका बाजूने सरकार आमच्या अन्यायाच्या कोणत्याही प्रकारच्या निवेदनावर कार्यवाही करत नसून, दुसरीकडे अशा प्रकारचे हल्ले होत असल्यामुळे न्याय मागणी कोणाकडे करावी अशी खंत महा-ई सेवा केंद्र संचालक राज्य संघटक माधुरी पवार सातारा यांनी व्यक्त केली, तसेच केंद्र सरकार तथा राज्य सरकारच्या घोषित झालेल्या सर्व योजना गावपातळीवरील लाभार्थ्यापर्यंत पोहोच करण्यात महा ई सेवा केंद्रांची मोठी भूमिका असल्यामुळे महा ई-सेवा केंद्र संचालकांवरील हल्ला प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, महा ई-सेवा केंद्र संचालक संघटनेच्यावतीने मंगरूळपीरच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी राज्य अध्यक्ष प्रभाकर भेंडेकर यांच्यासह सागर म्हैसने, शिवाजी गजभार, प्रकाश भगत, नितीन गावंडे, नीलेश भजने, सुनील स्वामी, चेतन गिरी, विजय परळीकर, धोंडू मनवर, उमेश गजभार  बडवे यांच्यासह तालुक्यातील बहुतांश केंद्रसंचालक व सहकारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन