शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या अनुकंपाधारकास अहर्तेनुसार वर्ग ३ ची नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 15:01 IST

वाशिम : राज्य परिवहन महामंडळातील ( एसटी ) कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्वावरील अवलंबित उमेदवारास वर्ग ३ मधील वाहतूक निरिक्षक, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, कनिष्ठ लेखाकार, भांडारपाल आदि पदांवर अर्हता व पात्रतेनुसार नियुक्ती देण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य परिवहन महामंडळातील ( एसटी ) कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्वावरील अवलंबित उमेदवारास वर्ग ३ मधील वाहतूक निरिक्षक, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, कनिष्ठ लेखाकार, भांडारपाल आदि पदांवर अर्हता व पात्रतेनुसार नियुक्ती देण्यात येत आहे. महामंडळाने गत आठवड्यात या संदर्भातील परिपत्रकानुसार विभाग नियंत्रक स्तरापर्यंत कार्यवाहीच्या पार पाडण्याच्या सुचनाही केल्या आहेत. तथापि, ही नियुक्ती देताना एसटी महामंडळाच्या २५ मे २०१६ च्या परिपत्रकाचा आधार घेण्याच्या सुचनाही केल्या आहेत.एसटी महामंडळाने अनुकंपा तत्वावर एसटी कर्मचाºयांच्या कुटूंबातील एका अवलंबितास वर्ग-३ (राज्यसंवर्ग) मधील कनिष्ठ वाहतूक नियंत्रक, कनिष्ठ सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, कनिष्ठ लेखाकार, कनिष्ठ भांडारपाल, कनिष्ठ स्थापत्य अभियंता संवर्गात विहित केलेली शैक्षणिक अर्हता आणि शारीरिक पात्रतेच्या अधीन, तसेच बिंदू नामावली व इतर तरतुदीचे पालन करून नियुक्ती देण्याच्या सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यातच १० आॅक्टोबर २०१८ रोजीच्या परिपत्रकानुसार एसटी महामंडळाने सर्व कर्मचाºयांना २५ एप्रिल २०१८ पासून नियमित वेतनश्रेणी लागू करून कनिष्ठ वेतनश्रेणी लागू केली आहे. तथापि, २१ मे २०१८ नुसार वर्ग ३ मधील ९ प्रवर्गाची वेतनश्रेणी उन्नत करून वेतन श्रेणी उन्नत करून त्यांना त्यांना वर्ग-२ कनिष्ठ अधिकारी पदाचा देण्यात आला असून, यात सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक व कनिष्ठ स्थापत्य अभियंता या दोन संवर्गाचा समावेश असल्याने हे दोन संवर्ग सोडून वाहतूक निरीक्षक, लेखाकार, भांडारपाल या ३ प्रवर्गात अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासाठी २५ मे २०१६ च्या परिपत्रकानुसार कार्यवाही करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारास शारीरिक व शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती देण्याबाबत पूर्वीही परिपत्रक प्राप्त झाले असून, त्याची कार्यवाहीही सुरू आहे. नव्या परिपत्रकातील सुचनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.-चेतना खिरवाडकरविभाग नियंत्रक, अकोला.

टॅग्स :washimवाशिमstate transportराज्य परीवहन महामंडळ