शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महानगरांतून वाशिम जिल्ह्यात परतलेल्या २७ हजार नागरिकांची प्रकृती ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 14:55 IST

ग्रामीण भागातील २३ हजार २०९, तर शहरी भागांतील ४ हजार नागरिकांचा समावेश होता.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने विविध कारणास्तव विदेशात, परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील २७ हजार ५०९ नागरिक आपापल्या परत गावी आले आहेत. त्यात ग्रामीण भागातील २३ हजार २०९, तर शहरी भागांतील ४ हजार नागरिकांचा समावेश होता. महानगरातून परतले असल्याने कोरोना संसर्गाच्या खबरदारीसाठी त्यांना १४ दिवस घरी थांबण्याचा सल्ला देण्यात आला, तसेच त्यांची तीन वेळा आरोग्य तपासणी करण्यात आली. आता १४ दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला असून, हे सर्व नागरिक स्वस्थ असल्याने यातील एकालाही कोरोना संसर्ग झाल्याची लक्षणे दिसून आली नाहीत.वाशिम जिल्ह्यात रोजगारांचे स्त्रोत अपुरे असल्याने प्रामुख्याने शेती कामांवरच जिल्ह्यातील बहुतांश जनतेच्या संसाराचा गाडा चालतो. त्यातही जिल्ह्यातत प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असल्याने खरीप हंगामानंतरच जिल्हाभरातील हजारो कामगार रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे आदी महानगरांसह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशात जातात. यंदा जिल्ह्यातील २७ हजार ५०९ नागरिक विविध कामासाठी परजिल्ह्यात, परराज्यात गेले होते. ते सर्व परतले आहेत. कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने या नागरिकांची तपासणी केली आणि १४ दिवस घरी थांबण्याचा सल्लाही दिला. या १४ दिवसांदरम्यान आरोग्य विभागाने त्यांच्यावर लक्ष ठेवत तीन वेळा तपासणी केली. तथापि, सर्वांची प्रकृती ठणठणीत असून, एकातही कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला असला तरी, कोरोना संसर्गाचा धोका संपला नसल्याने या कामगारांसह सर्वच जनतेला आवश्यक खबरदारी घेण्याच्या सुचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. 

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस