शिरपूर जैन (वाशिम) : घरच्या अठराविश्व दारिद्रयामुळे खेळण्या-बागडण्याच्या आणि मुक्तपणे शिक्षण घेण्याच्या वयात ठिकठिकाणी साचणाºया कचऱ्यातून प्लास्टिक गोळा करण्यात अनेक चिमुकल्या मुलांचे बालपण करपल्या जात आहे. शिरपूरसह परिसरातील ग्रामीण भागात अशी उपेक्षित चिमुकली मुले अनेक ठिकाणी आढळून येत आहेत.विविध स्वरूपातील कारणांमुळे शाळा आणि शिक्षणापासून दुरावलेल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनस्तरावरून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्ची घातल्या जातात. याशिवाय बालकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी देखील अनेक योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र या योजनांचा अथवा दरवर्षी खर्च होणाऱ्या निधीचा गोरगरिब तथा गरजू कुटूंबातील मुलांना कुठलाच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. पोटाची खळगी भरणे, हाच जीवनाचा एकमात्र उद्देश असणारेही अनेक कुटूंब सभोवताल असून अशाच काही कुटुंबातील मुले सकाळपासून सायंकाळपर्यंत दिसेल त्याठिकाणाहून, उन्हातान्हाची तमा न बाळगता कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून प्लास्टिक गोळा करतात. त्याच्या विक्रीतून मिळणाºया थोड्याथोडक्या पैशांच्या माध्यमातून कुटूंबास आर्थिक हातभार लावत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.
प्लास्टिक कचरा गोळा करण्यात करपले बालपण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 15:35 IST
शिरपूर जैन (वाशिम) : घरच्या अठराविश्व दारिद्रयामुळे खेळण्या-बागडण्याच्या आणि मुक्तपणे शिक्षण घेण्याच्या वयात ठिकठिकाणी साचणाºया कचऱ्यातून प्लास्टिक गोळा करण्यात अनेक चिमुकल्या मुलांचे बालपण करपल्या जात आहे. शिरपूरसह परिसरातील ग्रामीण भागात अशी उपेक्षित चिमुकली मुले अनेक ठिकाणी आढळून येत आहेत.विविध स्वरूपातील कारणांमुळे शाळा आणि शिक्षणापासून दुरावलेल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता ...
प्लास्टिक कचरा गोळा करण्यात करपले बालपण!
ठळक मुद्दे बालकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी देखील अनेक योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. या योजनांचा अथवा दरवर्षी खर्च होणाऱ्या निधीचा गोरगरिब तथा गरजू कुटूंबातील मुलांना कुठलाच फायदा होत नसल्याचे चित्र आहे. काही कुटुंबातील मुले सकाळपासून सायंकाळपर्यंत दिसेल त्याठिकाणाहून, उन्हातान्हाची तमा न बाळगता कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून प्लास्टिक गोळा करतात.