पतंग उडविताना विहिरीत पडून बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:55 AM2020-01-19T11:55:39+5:302020-01-19T11:55:49+5:30

ओम रवींद्र काकरवाल (वय १०) रा शहापूर असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

Child dies after falling into a well while flying a kite | पतंग उडविताना विहिरीत पडून बालकाचा मृत्यू

पतंग उडविताना विहिरीत पडून बालकाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : पंतग उडविण्यास गेलेल्या चिमुकल्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शहरातील बायपास रोडलगत शनिवार, १८ जानेवारी रोजीे दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. ओम रवींद्र काकरवाल (वय १०) रा शहापूर असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेने काकरवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ओम ने घरी खेळाला जातो म्हणून सांगितले आणि मित्रांसमवेत जवळच असलेल्या खरेदीविक्री संघाच्या मोकळ्या जागेवर तो पतंग उडविण्यासाठी गेला. पतंग उडवण्यात तो मित्रांसमवेत दंग झाला. पतंग पकडण्यासाठी धावत असताना ओम खरेदी विक्री संघाच्या मोकळ्या जागेवरील विहिरीत पाय घसरून पडला असावा असा कयास लावण्यात येत आहे. विहिरीत पाणी असल्याने ओम पाण्यात बुडाला. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक तेथे जमा झाले. नागरिकांनी या घटनेची माहिती मंगरूळपिर पोलिस आणि मंगरूळपिर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला दिली. मात्र तोपर्यंत बराच वेळ निघून गेला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदाळे सहायक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, आजीनाथ मोरे, व पोलीस कर्मचारी यांच्यासह अग्निशमन दलाच्या पथकाने व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीत शोध घेतला, परंतू ओम सापडला नाही . नंतर पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने सुद्धा जवळपास तीन ते चार तास शर्तीचे प्रयत्न केले परंतु तरीही ओम सापडला नाही . सदर विहिरीत प्रचंड प्रमाणात कचरा व गाळ असल्याने शोध कार्यात खूप बाधा येत होती, शेवटी स्वामी समर्थ इजिनिअर्सचे कामगार यांनी संध्याकाळी ७ वाजता रेस्कीव्ह आॅपरेशन ला पोकल्यालँड द्वारे सुरुवात केली होती. या वेळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. संध्याकाळी ८.३० वाजता वृत्त लिहेपर्यंत ओमचा मृतदेह सापडला नव्हता
ओमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी मंगरूळपिर चे तहसीलदार किशोर बागडे,नगर परिषद चे मुख्यधीकारी मिलिंद दारोकार,पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत केडगे,ठाणेदार धंनजय जगदाळे व पोलीस कर्मचारी तळ ठोकून होते.

Web Title: Child dies after falling into a well while flying a kite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम