शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना : पश्चिम वऱ्हाडातील ४६ रस्त्यांची होणार ‘दर्जोन्नती’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 19:13 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांतील ४६ रस्त्यांची दर्जोन्नती केली जाणार असून, यासाठी १३९ कोटी १९ लाख रुपयांच्या अंदाजित रकमेच्या कामांना ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यताही दिली आहे.

वाशिम - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांतील ४६ रस्त्यांची दर्जोन्नती केली जाणार असून, यासाठी १३९ कोटी १९ लाख रुपयांच्या अंदाजित रकमेच्या कामांना ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यताही दिली आहे. आवश्यक ते प्रशासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर तांत्रिक मान्यता मिळण्याची आता प्रतीक्षा लागून आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी निधी पुरविला जातो. सन २०१८-१९ या वर्षात पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात विविध टप्प्यात रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेची कार्यवाही सुरू असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बॅच - ४ या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील एकूण १३ कामांना ९ आॅक्टोबर रोजी ग्रामविकास विभागाची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. आता तांत्रिक मान्यतेसाठी आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. या १३ कामांमध्ये वाशिम तालुक्यातील पाच, कारंजा तालुक्यातील चार, रिसोड व मालेगाव तालुक्यातील प्रत्येकी दोन रस्ते कामांचा समावेश आहे.या १३ कामांवर २८ कोटी २८ लाख १७ हजार रुपयांचा खर्च होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. याप्रमाणेच अकोला व बुलडाणा जिल्ह्यातही काही रस्त्यांची दर्जोन्नती केली जाणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत संशोधन व विकास अंतर्गत अकोला जिल्ह्यातील एकूण १७ कामांच्या ७९ कोटी २० लाख ६८ हजार रुपयांच्या कामांनाहीप्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. मु्ख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात बॅच -२ अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील १६ रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी ३१ कोटी ७१ लाख २२ हजार रुपयांच्या अंदाजित रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून, आता तांत्रिक मान्यतेची प्रतिक्षा आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन २०१८-१९ या वर्षातील बॅच - चार अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील रस्त्यांच्या दर्जोन्नतीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. संबंधित यंत्रणेद्वार तांत्रिक मान्यतेची कार्यवाही केली जात आहे.-व्ही.बी. गहेरवारकार्यकारी अभियंता, बांधकाम विभागजिल्हा परिषद वाशिम.

टॅग्स :washimवाशिमMaharashtraमहाराष्ट्र