शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिनी मुख्यमंत्र्यांनी साधला जिल्ह्यातील शिक्षकांशी संवाद

By संतोष वानखडे | Updated: September 5, 2022 18:03 IST

शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ सप्टेंबर रोजी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून जिल्हयातील शिक्षकांशी संवाद साधला.

वाशिम : शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ सप्टेंबर रोजी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून जिल्हयातील शिक्षकांशी संवाद साधला. जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेचे सहायक शिक्षक राजू महल्ले, वाशिमच्या बाकलीवाल विद्यालयाचे कला शिक्षक अमोल काळे आणि वाशिमच्या राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी या शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संजय जोल्हे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, आकाश आहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षकांनी आजच्या संवादातून जे प्रश्न उपस्थित केले आणि ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्या निश्चितपणे सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यशस्वी जीवनात शिक्षकांचे स्थान आगळे वेगळे आहे. आई-वडीलांसह आपल्याला घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. ज्ञानदानाची शिक्षकांची भूमिका आजही कायम असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. वाशिम येथून मुख्यमंत्र्यांशी शिक्षक दिनानिमित्त आयोजित संवाद कार्यक्रमामध्ये शिक्षक संभाजी साळसुंदर, केंद्र प्रमुख इंदिरा राणे, शरद सुरशे, सुनिल ठाकरे, नारायण गारडे, शैलेश मवाळ, रणजीत जाधव, देविदास वानखेडे, मित्रचंद वाटकर व कारंजा येथील प्रशांत गंधक आदी शिक्षक सहभागी झाले होते.

सरकारी शाळांसाठी प्रोत्साहनपर योजना सुरू कराव्याशिक्षक महल्ले यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना, सध्याच्या कॉन्व्हेंट संस्कृतीमध्ये मातृभाषेतून, मराठीतून शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या व नगर परिषदेच्या शाळांना शासनाकडून बदलत्या काळानुसार काही प्रोत्साहनपर योजना सुरू करता येतील काय, जेणेकरून मराठी भाषा समृद्ध होण्यास मदत होईल व या शाळा टिकून राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कला शिक्षक काळे यांनी कला विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन असल्याचे सांगत कला विषयाचे महत्व वाढविण्यासाठी काही उपाययोजना कराव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कुळकर्णी यांनी ग्रामीण भागामध्ये विशेषतः आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या पालकांमध्ये मुलींच्या शिक्षणाबाबतची उदासीनता दिसून येते. अशा कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी काही उपाययोजना करण्यात याव्या, असे त्यांनी सुचविले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेTeachers Dayशिक्षक दिन