शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जलस्रोतांची रासायनिक तपासणी; राज्यात बुलडाणा प्रथम तर वाशिम तृतिय क्रमांकावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 13:57 IST

२.६९ लाखांपैकी नोव्हेंबरअखेर १.५१ लाख पाणी नमुने गोळा झाले असून, यामध्ये राज्यात बुलडाणा प्रथम तर वाशिम जिल्हा तृतिय क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देराज्यभरातील २ लाख ६९ हजार २४७ स्रोतांपैकी १ लाख ५१ हजार १२८ पाणी नमुने गोळा करण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्याने ९९.०५ टक्के नमुने गोळा करीत पहिला क्रमांक पटकावला.या प्रक्रियेत उस्मानाबाद जिल्हा ९७.९१ क्रमांकासह दुसऱ्या स्थानावर आहे.

वाशिम : सन २०१८-१९ या वर्षातील मान्सून पश्चात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक तपासणी १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान करण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत २.६९ लाखांपैकी नोव्हेंबरअखेर १.५१ लाख पाणी नमुने गोळा झाले असून, यामध्ये राज्यात पश्चिम वºहाडातील बुलडाणा प्रथम तर वाशिम जिल्हा तृतिय क्रमांकावर आहे. या प्रक्रियेत अकोला जिल्हा माघारल्याचे दिसत आहे.महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लीकेशन सेंटर नागपूर (एमआरएसएसी) नागपूर यांनी तयार केलेल्या जीओफेन्सिंग मोेबाइल अ‍ॅप्लीकेशनचा वापर करून जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांचे व स्रोतांची रासायनिक तपासणीसाठी पाणी नमुने गोळा करण्याच्या सूचना सर्व जिल्हा परिषदांच्या पाणी पुरवठा विभागाला देण्यात आल्या होत्या. या अंतर्गत ३० आॅक्टोबर २०१८ ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत राज्यभरातील २ लाख ६९ हजार २४७ स्रोतांपैकी १ लाख ५१ हजार १२८ पाणी नमुने गोळा करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत पश्चिम वºहाडातील बुलडाणा जिल्ह्याने ९९.०५ टक्के नमुने गोळा करीत पहिला क्रमांक पटकावला, तर वाशिम जिल्ह्याने ८५.१४ टक्क्यांसह तिसरा क्रमांक पटकावला. या प्रक्रियेत उस्मानाबाद जिल्हा ९७.९१ क्रमांकासह दुसऱ्या स्थानावर आहे. या प्रक्रियेत पहिल्या दहा जिल्ह्यात अमरावती, नाशिक, धुळे, लातूर, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून राबविण्यात येणारी ही प्रक्रिया यशस्वी ठरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यासाठी जिल्हा, तालुका व ग्राम पंचायतींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आता येत्या २५ दिवसांत सर्व जिल्हा परिषदांना पाणी नमुने गोळा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. कौतुकाची थापपाणी नमुने तपासणीत नोव्हेंबर अखेरीस पहिल्या १० क्रमांकापर्यंत असलेल्या जिल्हा परिषदांचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने कौतुक केले आहे. ही बाब पश्चिम वºहाडातील बुलडाणा, वाशिम जिल्हा परिषद प्रशासनाचा आत्मविश्वास वाढविणारी असून, अन्य प्रशासकीय कामगिरीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे बोलले जात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाbuldhanaबुलडाणाwashimवाशिम