शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

संजय गांधी निराधार योजना विभागात सावळा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 17:25 IST

Mangrulpir News : आमदार लखन मलीक यांनी तहसील कार्यालय गाठून संबंधित ‘बाबूं’ची चांगलीच खरडपट्टी काढली.

मंगरूळपीर : येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात सध्या पुरता सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, निराधार, दिव्यांगांना जाणवत असलेल्या समस्यांवरून या मतदारसंघाचे आमदार लखन मलीक यांनी तहसील कार्यालय गाठून संबंधित ‘बाबूं’ची चांगलीच खरडपट्टी काढली. हा प्रकार येथे १६ जून रोजी घडला.राज्य शासनाकडून दिव्यांग व्यक्ती, वृद्ध, निराधार, विधवा महिलांसाठी अनुदान योजना राबविण्यात येते. तहसील कार्यालयात यासाठी स्वतंत्र कार्यालय थाटण्यात आले आहे; मात्र मंगरूळपीर येथील तहसील कार्यालयात असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांची लेटलतिफशाही, मुजोरी व दलालांच्या सुळसुळाटामुळे खऱ्याअर्थाने पात्र असलेल्या लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकांनी आमदार मलिक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत १६ जून रोजी मलिक यांनी तहसील कार्यालयात धडक दिली. तहसीलदार तसेच संजय गांधी निराधार योजना विभागातील लिपिकांची यावेळी त्यांनी चांगलीच दमछाक केली. अनुदानासाठी पात्र असलेल्या खऱ्या लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी का दिल्या जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित करून लाभार्थ्यांसमोरच अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. याबाबत जिल्हाधिकारी यांना सुद्धा कळविण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत नितेश मलिक, योगेश देशपांडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. मलिकांनी विश्रामगृहाचे कुलूप तोडले

आमदार लखन मलिक हे वरकरणी शांत स्वभावाचे दिसत असले तरी १६ जून रोजी मात्र ते चांगलेच संतापल्याचे पाहावयास मिळाले. कार्यकर्ते व विविध योजनांचे अनेक लाभार्थी हे मंगरूळपीर येथील विश्रामगृहावर आमदार मलिक यांना भेटायला आले होते; मात्र विश्रामगृहावर यावेळी एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे आमदारांना बाहेरच ताटकळत थांबावे लागले. शेवटी मलिक यांनी स्वत: पुढाकार घेऊन चक्क विश्रामगृहाच्या दरवाजाचे कुलूप तोडून टाकले व त्यानंतर उपस्थित लाभार्थी व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरLakhan Malikलखन मलिकwashimवाशिम