शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम, मालेगावात ‘गण, गण,गणात बोते’चा गजर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 15:17 IST

मालेगाव (वाशिम) : दरवर्षीप्रमाणे यंदाही वाशिम, मालेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरावर प्रकटदिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवार २४ जानेवारी रोजी शहरात हजारो भाविकांच्या सहभागाने भव्य पालखी काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव (वाशिम) : दरवर्षीप्रमाणे यंदाही वाशिम, मालेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरावर प्रकटदिन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रविवार २४ जानेवारी रोजी शहरात हजारो भाविकांच्या सहभागाने भव्य पालखी काढण्यात आली. वाशिम येथे जागोजागी पालखीचे स्वागत करण्यात आले .ढोल, ताशांच्या गजरात विविध ठिकाणी आतषबाजी करून या पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी गण, गण, गणात बोतेच्या गजराने मालेगाव शहर दुमदुमले होते.  मालेगाव येथील वाशिम रोडवर असलेल्या संत गजानन महाराज मंदिरात प्रकट दिन उत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त २१ फेब्रुवारीपासून विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले. यात २४ फेब्रुवारीपर्यंत ७ अध्यायाचे सामुहिक वाचन करण्यात आले, तर सकाळी १० वाजत श्रींच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. ही पालखी दुर्गा चौकातून निघल्यानंतर गावातील मुख्य मागार्ने गांधी चौक, शिव चौक, मेडिकल चौक आणि जुन्या बस स्थानकामार्गे पुन्हा गजानन महाराज मंदिर येथे नेण्यात आली. पालखीत हजारावर महिला, पुरुष भाविकांचा सहभाग होता. ट्रॅक्टरवर थर्माकोलचे आकर्षक मंदीर तयार करण्यात आले होते. एका रथात गजानन महाराजांची सुशोभित प्रतिमा ठेवण्यात आली होती. या पालखीच्या स्वागतासाठी मार्गावर विविध ठिकाणी महिलांनी आकर्षक रांगोळी काढली होती. सेवाभावी लोकांनी ठिकठिकाणी चहापान, फराळ आणि शीतपेयाची व्यवस्था करून पालखीतील भाविकांना वितरण केले. या सेवाभावी लोकांत आशिष बळी, मुन्ना शिर्के, किशोर महाकाळ, संजय रतनलाल लटुरिया यांचा समावेश होता. ठिकठिकाणी आतषबाजी करण्यात आली.  ढोल, ताशा, टाळ, मृदंगाच्या गजरात गोभनी येथील वारकरी संप्रदायचे भाविक यात सहभागी झाले होेते. पालखीदरम्यान शांतरा राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवGajanan Maharajगजानन महाराज