पोहरादेवीकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:30+5:302021-04-17T04:40:30+5:30

या आदेशानुसार कारंजा येथून मानोरा, पोहरादेवी मार्गे दिग्रसकडे जाणारी वाहतूक कारंजा ते मानोरा मार्गे दिग्रस या मार्गाने वळविण्यात आली ...

Changes in the transport route to Pohardevi | पोहरादेवीकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल

पोहरादेवीकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल

Next

या आदेशानुसार कारंजा येथून मानोरा, पोहरादेवी मार्गे दिग्रसकडे जाणारी वाहतूक कारंजा ते मानोरा मार्गे दिग्रस या मार्गाने वळविण्यात आली आहे. दिग्रस येथून सावळी फाटा, वाईगौळ मार्गे पोहरादेवीकडे जाणारी वाहतूक दिग्रस येथून सावळी फाटा, वाईगौळ मार्गे मानोराकडे वळविण्यात आली आहे. पुसद येथून सिंगद मार्गे पोहरादेवीकडे जाणारी वाहतूक पुसद येथून सिंगद मार्गे दिग्रसकडे वळविण्यात आली आहे. मानोरा येथून पंचाळा फाटा, पोहरादेवी मार्गे दिग्रसकडे जाणारी वाहतूक आता मानोरा ते दिग्रस मार्गाने वळविण्यात आली आहे. धानोरा फाटा येथून रतनवाडी, फुलउमरी, पोहरादेवी मार्गे दिग्रसकडे जाणारी वाहतूक आता धानोरा फाटा येथून रतनवाडी फाटा, मानोरा मार्गे दिग्रसकडे वळविण्यात आली आहे. तसेच मंगरूळपीर येथून साखरडोह, मानोरा, पोहरादेवीमार्गे दिग्रसकडे जाणारी वाहतूक आता मंगरूळपीर येथून साखरडोह, मानोरामार्गे दिग्रसकडे वळविण्यात आली आहे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Changes in the transport route to Pohardevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.