शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणात बदलामुळे वाशिम जिल्ह्यातील तूर, हरभरा पीक धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 19:32 IST

वातावरणातील सततच्या बदलामुळे तुरीसह हरभरा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसानाची संभावना व्यक्त केली जात आहे. हरभºयावर ढगाळ वातावरणामुळे मोठया प्रमाणात अळया पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केल्या जात आहे.

ठळक मुद्देगव्हाला पोषक वातावरण तुरीचा फुलोर गळाला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वातावरणातील सततच्या बदलामुळे तुरीसह हरभरा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसानाची संभावना व्यक्त केली जात आहे. हरभ-यावर ढगाळ वातावरणामुळे मोठया प्रमाणात अळया पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केल्या जात आहे.वाशिम जिल्हयात गत पंधरा दिवसांपासून अधून मधून वातावरणात अचानक बदल पडत आहे. कधी थंडी, कधी ढगाळ तर कधी उन्ह पडत असल्याने याचा पिकांना फटका बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या झाडांची फुले गळून गेल्याने त्यातून काहीचउत्पन्न होण्याची शक्यता दिसून येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अनेक शेतामध्ये केवळ फुलो-याविना तुरटयाच शेतात उभ्या दिसून येत आहेत. अनेक शेतक-यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी हरभरा पिकांची पेरणी केली. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हरभºयांवर अळया पडण्यास सुरुवात झाल्याने त्यावर नियंत्रणासाठी शेतकरी धावपळ करतांना दिसून येत आहे. गत दोन वर्षांपासून अगोदरच सोयाबीन, तूर , हरभरा या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने त्रस्त असलेल्या शेतक-यांना या अस्मानी संकटामुळे चिंतेत टाकले आहे. या वातावरणातील बदलामुळे भाजीपाला उत्पादक शेतक-यांचेही मोठया प्रमाणात नुकसान होत असल्याचे भाजीपाला उत्पादक शेतकरी सांगत आहेत. अनेक शेतकºयांना तुरीची सोंगणी व काढणीला लागणारा खर्चही निघणार नसल्याचे चित्र आहे.

 

शेतक-यांची धडपड

  • वातावरणातील बदलामुळे हरभरावर पडत असलेल्या अळयांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी धावपळ सुरु केली आहे. कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करुन पीके वाचविण्यासाठी काय उपाय योजना कराव्यात यासंदर्भात शेतकरी माहिती घेतांना दिसून येत आहेत. हातचे पीक न जाण्यासाठी धडपड दिसून येत आहे. 
  • गत आठ दिवसांपासून पडत असलेली थंडी गव्हाला पोषक ठरत असल्याने गहू उत्पादक शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. परंतु यामध्ये अनेक शेतकºयांनी तूर व हरभरा सुध्दा पेरला असल्याने त्याचे नुकसानाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
  • शेतक-यांवर वातावरणातील बदलामुळे उदभवलेले संकट टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतात जावून मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
  • तूर उत्पादक शेतक-यांना लावलेला खर्च ही येणाºया उत्पादनातून होणार नसल्यासने अनेक शेतकरी पुढील नियोजनाच्या चिंतेत आहेत.

वातावरणातील बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकºयांना कृषी विभागाने मार्गदर्शन करुन शेतकºयांना संकटातून काढण्याचा मार्ग सांगावा व तसे मार्गदर्शनासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.                   - गणेश इरतकर, शेतकरी 

टॅग्स :agricultureशेती