वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना अकरावीत कोणत्या आधारावर प्रवेश द्यावा याबाबत वरिष्ठ स्तरावर मंथन सुरू आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा विचार शासनस्तरावर सुरू असला तरी परीक्षा नेमकी कशी व केव्हा घ्यायची याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षादेखील रद्द केल्या. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा एकूण ३६३ आहेत. यामध्ये एकूण १९,७१५ विद्यार्थी आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी अकरावीत प्रवेश घेण्यासाठी कोणते निकष लावले जाणार याची चिंताही आहे. वाशिम जिल्ह्यात अकरावीच्या २१ हजारावर जागा असल्याने प्रवेशासाठी ओढाताण होत नसली तरी शहरातील काही नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड असते. अकरावीच्या प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १०० गुणांची आॅफलाइन सीईटी परीक्षा घेण्याविषयी शिक्षण विभाग चाचपणी करत आहे. यातील गुणावरच अकरावीचे प्रवेश निश्चित करण्याचा मानस आहे. मात्र, मोठ्या संख्येने असणाऱ्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा कोरोनाकाळात कशी घ्यायची याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे़
०००००००००००
तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय?
दहावी परीक्षेत मिळालेल्या गुणांवरच तंत्रनिकेतन, आयटीआयमध्ये प्रवेश मिळतो. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात येणार असला तरी तंत्रनिकेतत, आयटीआय प्रवेशासाठी कोणते निकष लावले जाणार? याबाबत पालकांसह विद्यार्थीदेखील संभ्रमात असल्याचे दिसून येते.
००००००००००००
आॅफलाईन झाली तर कोरोनाचे काय?
कोरोनाकाळात आॅफलाइन सीईटी परीक्षा घेतली तर कोरोना संसर्ग रोखावा कसा? असा प्रश्न प्रशासनासमोर राहणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, त्यात पुन्हा आॅफलाईन परीक्षा घेतली तर कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
०००००
आॅनलाइन झाली तर ग्रामीण भागाचे काय?
कोरोनामुळे आॅनलाइन सीईटी घेण्याचा विचार केला तर याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसण्याची सर्वाधिक शक्यता आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नेटवर्क अभाव तसेच अँण्ड्राडड मोबाइल अनेक विद्यार्थ्यांकडे नाहीत. यातून परीक्षेला मुकाचे लागण्याची भितीही आहे़
०००००
अंतर्गत मुल्यमापन कसे होणार ?
दहावीतील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन बहुतांश शाळांत झाले नाही. आॅनलाइन शिक्षण सुरू असले असले तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन कसे करायचे याबाबत अद्याप मार्गदर्शन सूचना आलेल्या नाहीत. मार्गदर्शनक सूचना मिळाल्याानंतरच विद्यार्थ्यांंचे मुल्यमापन करणे शक्य होणार असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
०००
कोट
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहावीची परीक्षा रद्द केली आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी किचकट ठरणार आहे़ सर्वच शाखेचे हजारो विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देणार असल्याने यंत्रणेवर ताण वाढणार आहे़ कोरोनाकाळात ग्रामीण भागात अशी परीक्षा घेणे अवघडच ठरणारे आहे.
- विनोद नरवाडे, प्राचार्य
000
प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार प्रवेश प्रक्रिया राबविली तर कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी राहिल. कोरोनाकाळात अकरावी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेणे थोडे कठीणच जाईल. शहरी भागात परीक्षा घेणे फारसे अवघड जाणार नाही; परंतू ग्रामीण भागात नियोजन करणे थोडे अवघडच असते.
- कल्याण महाराज जोशी, प्राचार्य
००००
विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनासाठी परीक्षा आवश्यकच आहे. परंतू, कोरोनाकाळात आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यावी कशी हा प्रश्न आहे. परीक्षा घेताना १५ दिवस किंवा एक महिना आधी विद्यार्थ्यांना सुचना द्याव्यात़ तसेच दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत ही परीक्षा असावी़
- राजेश नंदकुले, प्राचार्य
00000
अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील जागा २१५०
शहरातील एकूण जागा ३६८०