शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाकडून वाशिम जिल्ह्यातील पीक नुकसानाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 16:26 IST

डॉ. आर.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्राची रविवार, २४ नोव्हेंबर रोजी पाहणी करून बाधीत शेतकºयांशी संवाद साधला.

बाधीत शेतकºयांशी संवाद : पथकातील अन्य अधिकाºयांची उपस्थितीलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. केंद्र सरकारने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गठीत केले असून पथकातील केंद्रीय कृषि मंत्रालयांतर्गत येणाºया कापूस विकास संचालनालयाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्राची रविवार, २४ नोव्हेंबर रोजी पाहणी करून बाधीत शेतकºयांशी संवाद साधला.यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, रिसोडचे तहसीलदार अजित शेलार, वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर यांची उपस्थिती होती.सिंग यांच्या पथकाने रिसोड तालुक्यातील महागाव येथील माधव गायकवाड यांच्या नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली. गायकवाड यांनी यंदा ३ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. त्यापैकी बहुतांश सोयाबीनचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. जे काही सोयाबीन होणार आहे, त्यालाही जेमतेम दर मिळणार आहे. तुरीचेही पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे ते म्हणाले. महागाव शेतशिवारात सुमारे ६४२ हेक्टरवर सोयाबीन पेरण्यात आले होते, यापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाल्याची माहितीही त्यांनी दिली.पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे बाळखेड येथील रमेश भारती यांच्या शेतातील पीक नुकसानाचीही सिंग यांच्या पथकाने पाहणी केली. भारती यांच्या नदीकाठी असलेल्या तीन हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन आणि तूर पिकाचे प्रचंड नुकसान झाले. पुरामुळे जमीन खरडून गेली असून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी किमान पाच वर्षे लागतील, ही बाब भारती यांनी सिंग यांच्या निदर्शनास आणून दिली. या भेटीत डॉ. आर.पी. सिंग यांच्या पथकाने जिल्ह्यातील इतरही नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेतले.दरम्यान, जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यातील पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे करून तसे सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मोडक यांनी डॉ. सिंग यांना सांगितले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती