सुनील काकडे, वाशिम : जिल्ह्यातील किन्हीराजा (ता.मालेगाव) येथून जवळच असलेल्या एरंडा येथे १४ जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे जवळून वाहणाऱ्या लेंढी नाल्याला मोठा पूर येवून जनजीवन पुरते विस्कळित झाली. स्मशानभूमी देखील पुराच्या पाण्याने वेढल्या गेली. सरण रचण्यासाठी वापरल्या जाणारी शवदाहिनी पाण्याखाली दबल्या गेली. तथापि, असा प्रसंग वारंवार घडत राहिल्यास या दिवसांत मृतकांवर अंत्यसंस्कार करणार कुठे, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
स्मशानभूमीला पुराचा वेढा; अंत्यसंस्कार कुठे करणार?
By सुनील काकडे | Updated: July 14, 2024 18:16 IST