भर जहागीर येथे स्वातंत्र्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:47 IST2021-08-17T04:47:26+5:302021-08-17T04:47:26+5:30

ग्रामपंचायत आवारात सरपंच पी. के. चोपडे, अनिल गरकळ, रवींद्र आढाव, उपसरपंच वर्षा काळदाते, सचिव एन. के. भुसारी, मंडल अधिकारी ...

Celebrate Independence Day at Bhar Jahagir | भर जहागीर येथे स्वातंत्र्य दिन साजरा

भर जहागीर येथे स्वातंत्र्य दिन साजरा

ग्रामपंचायत आवारात सरपंच पी. के. चोपडे, अनिल गरकळ, रवींद्र आढाव, उपसरपंच वर्षा काळदाते, सचिव एन. के. भुसारी, मंडल अधिकारी समाधान जावळे, तलाठी रवींद्र खंदारे, प्रल्हाद फुके आदींच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपसरपंच काळदाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. केंद्रप्रमुख संतोष भिसडे, मुख्याध्यापक सुरेश मोरे, माजी सैनिक अशोक सोगे, अध्यक्ष संजय चोपडे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी शिक्षक, शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची उपस्थिती होती. शिवाजी विद्यालयात महंत रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य वानखडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव भिकाजी नागरे, संचालक डाॅ. श्रीराम गरकळ व इतर संचालक, शिक्षक उपस्थित होते. स्वप्नपूर्ती इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक समाधान सानप यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

Web Title: Celebrate Independence Day at Bhar Jahagir