शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सावधान... मास्क नाही, तर भरा ५०० रुपये दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:16 IST

तीन दिवसामध्ये हजारो नागरिकांवर जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनच्यावतिने राबविण्यात आलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमिवर जिल्हा प्रशासनाच्यावतिने वारंवार सूचना देवूनही मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुध्द जिल्हा पोलीस विभागाच्यावतिने गत तीन दिवसांपासून धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तीन दिवसामध्ये हजारो नागरिकांवर जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनच्यावतिने राबविण्यात आलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लॉकडाऊन लागल्यापासून पोलीस विभागाच्यावतिने ४३१६ जणांकडून नियमांचे उल्लंघन प्रकरणी १३.७७ लाख रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये विना मास्क, वाहतुक नियमांचे पालन न करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनासह ईतर मुद्यांचा समावेश आहे. तसेच संचारबंदीमध्ये काहीही काम नसतांना शहरातून फिरणाºया वाहनांवरही कारवाई करण्यात आली. यामध्ये ट्रिपल सीट जाणाºया ८७२ दुचाकी वाहनांवर कारवाई तर ८९५ वाहने जप्त करण्यात आली. या मोहीमेमुळे नागरिकांनी धास्ती घेतली.

जिल्हयातील सर्व ठाणेदारांना कारवाईचे आदेशकोरोनाच्या पृष्ठभूमिवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगय न करता कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेसी यांनी सर्व पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना दिल्याने सर्वत्र कारवाई मोहीम सुरु आहे.

अनेकांची पंचाईतजिल्हाभर पोलीस विभागाच्यावतिने सुरु करण्यात आलेल्या धडक कारवाईमुळे अनेक जण आपल्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना फोन लावून गाडी पकडल्याचे सांगतात. अशावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी फोन घेण्यास टाळत असल्याने कार्यकर्त्यांसमोर संबधितांची पंचाईत होत आहेजिल्हावासियांचे आरोग्य अबधित रहावे याकरिता पोलीस प्रशासनाच्यावतिने कठोर पावले उचलण्यात येत आहेत. नागरिकांनी सहकार्य करुन नियमांचे पालन करा. जिल्हयात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण पाहता नागरिकांनी मास्कचा वापर करा, विनाकारण बाहेर पडू नका. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे.- वसंत परदेसी,पोलीस अधीक्षक, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या