शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाची कार चढली वऱ्हाडींच्या  अंगावर;  ७ जखमी, ३ गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 18:34 IST

कारंजा लाड: विवाह सोहळ्यात लग्नमंडपात जात असताना निघालेल्या वरातीदरम्यान चालकाच्या चुकीमुळे नवरदेवाची कार वऱ्हाडींच्या अंगावर चढली. या अपघातात वरातीत नृत्य करणारे ७ वऱ्हाडी  जखमी झाले.

ठळक मुद्दे बेलमंडळ येथील राजू मनवर यांची कन्या दिक्षा व मंगरूळपीर तालुक्यातील भूर येथील महादेव भगत यांचे चिरंजीव सतिश यांचा विवाह सोहळा पार पडला.कार चालकाचे दुर्लक्ष झाल्याने त्याचा पाय ब्रेकवरून घसरून अ‍ॅक्सीलेटरवर पडला आणि ही कार वरातीत डिजेच्या तालावर नृत्य करणाºया वऱ्हाडींच्या  अंगावर गेली. . सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

कारंजा लाड: विवाह सोहळ्यात लग्नमंडपात जात असताना निघालेल्या वरातीदरम्यान चालकाच्या चुकीमुळे नवरदेवाची कार वऱ्हाडींच्या अंगावर चढली. या अपघातात वरातीत नृत्य करणारे ७ वऱ्हाडी  जखमी झाले. यातील तिघे गंभीर जखमी आहेत. ही घटना कारंजा तालुक्यातील पोहा येथे शुक्रवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.  पोहा येथील तुळजाभवानी मंदिरात ११ मे रोजी दुपारी ११ वाजता कारंजा तालुक्यातील बेलमंडळ येथील राजू मनवर यांची कन्या दिक्षा व मंगरूळपीर तालुक्यातील भूर येथील महादेव भगत यांचे चिरंजीव सतिश यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात नवरदेव बोहल्यावर चढण्यापूर्वी हनुमान मंदिरापासून नवरदेवाची वरात काढण्यात आली. वाजतगाजत ही वरात जात असताना नवरदेव बसलेल्या एमएच-१२, पीक्यू-८४३५ क्रमांकाच्या कार चालकाचे दुर्लक्ष झाल्याने त्याचा पाय ब्रेकवरून घसरून अ‍ॅक्सीलेटरवर पडला आणि ही कार वरातीत डिजेच्या तालावर नृत्य करणाºया वऱ्हाडींच्या  अंगावर गेली. या अपघातात नवरदेवाच्या आईसह ७ जण जखमी झाले. माला धम्माचंद आडोळे रा. भूर ता मंगरूळपीर, लक्ष्मी अरूण इंगोले रा. कोंडोली ता. मानोरा, वंदना महादेव भगत रा. भूर ता. मंगरूळपीर, ज्ञानूबाई मोतीराम मनवर रा. शिरजगाव ता. मंगरूळपीर, जयवंताबाई अंबादास भगत, कोमल सुखदेव अजळे, व वनमाला विठ्ठल आडोळे रा. भूर ता. मंगरूळपीर यांचा जखमी व्यक्तीत समावेश आहे. सर्व जखमींना प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर यातील तीन व्यक्ती गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रवाना करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाAccidentअपघात