शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीनेही स्वीकारणार उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 7:43 PM

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

वाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून,  उमेदवारी अर्जाचा अंतिम दिवस लक्षात घेता ३० डिसेंबर राेजी पारंपारिक पद्धतीने (ऑफलाईन स्वरुपात) उमेदवारी अर्ज सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सुनील विंचनकर यांनी दिली.२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून ३० डिसेंबर हा अंतिम दिवस आहे. उमेदवारी अर्ज संगणकीय प्रणालीद्वारे दाखल करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज सादर करताना इंटरनेटची गती कमी होणे, सर्व्हर अडचण आदी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळपासून राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच अर्ज दाखल करण्याचा कालावधी सुद्धा ३० डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत वाढविण्यात आला आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने स्वीकारणार

ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गैरसोय होवू नये, यासाठी ३० डिसेंबर २०२० रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. अर्जदारांची संख्या विचारात घेता, आवश्यकतेनुसार अर्ज स्वीकारण्याचे टेबल, खिडक्या वाढविण्यात याव्यात  तसेच कार्यालय पूर्ण वेळ, आवश्यकतेप्रमाणे सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारेपर्यंत सुरु ठेवावे, अशा सूचना संबंधित विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

 

निवडणूक खर्चासाठी जुने बँक खाते वापरण्यास परवानगी

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारास निवडणुकीत खर्च करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक, शेड्युल बँक याबरोबरच को-ऑप. बँकेत सुद्धा स्वतंत्र बँक खाते उघडण्यास तसेच या  बँक खात्यामधूनच निवडणूक खर्च करण्यास २४ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्रान्वये परवानगी देण्यात आली आहे. एप्रिल २०२० ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका ३१ मार्च २०२० रोजी होणार होत्या. मात्र, कोविड-१९ प्रादुर्भावामुळे या  निवडणुका स्थगित करण्यात आल्या. या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारांनी उमदेवारी अर्ज भरतेवेळी निवडणूक खर्चासाठी बँक खाते उघडले असल्यास, त्याच खात्यातून खर्च करण्यास मुभा देण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी विंचनकर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक