शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यातून केवळ एकच दिवस हळद खरेदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:42 IST

हळदीची आवकही वाढली आहे. मात्र, रिसोड बाजार समितीत आठवड्यात केवळ गुरूवार या एकाच दिवशी हळद खरेदी केली जात आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : बाजारभावात वाढ झाल्याने हळदीची आवकही वाढली आहे. मात्र, रिसोड बाजार समितीत आठवड्यात केवळ गुरूवार या एकाच दिवशी हळद खरेदी केली जात असल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी बाजार समितीचे संचालक विजयराव गाडे, घनश्याम मापारी यांनी केली.रिसोड तालुक्यातील अनेक शेतकरी हळदीचे उत्पादन घेत आहेत. हळद या पिकाला बाजारपेठ मिळावी या दृष्टिकोनातून रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्यातील गुरूवार या दिवशी हळद खरेदी केली जाते. अलिकडच्या काळात हळदीच्या प्रति क्विंटल बाजारभाव वाढ झाल्याने आवकही वाढत आहे. साधारणत: १५ दिवसांपूर्वी हळदीला प्रती क्विंटल ५५०० रुपयाच्या आसपास बाजारभाव होते. आता बाजारभावात तेजी आली असून, १६ मे रोजी हळदीला प्रति क्विंटल ६४५० रुपये असे बाजारभाव होते. अन्य बाजार समितीच्या तुलनेत रिसोड बाजार समितीत जास्त बाजारभाव असल्याने गुरूवार, १६ मे रोजी नंदू वाणी रा. कोंडाळा ता. वाशिम येथील शेतकºयाने २५ क्विंटल हळद रिसोड येथील बाजार समितीत विक्रीसाठी आणली होती. आवक वाढत असल्याने आठवड्यातील दोन दिवस हळद खरेदी सुरू करावी, अशी मागणी बाजार समिती प्रशासनाकडे यापूर्वीदेखील केली होती. मात्र, अद्याप आठवड्यातील दोन दिवस हळद खरेदी सुरू झाली नाही, असा दावा संचालक विजयराव गाडे, घनश्याम मापारी यांनी केला. आठवड्यातील दोन दिवस हळद खरेदी सुरू करण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा किंव्हा संचालक मंडळाची सभा बोलावून त्यामध्ये हळद खरेदी आठवड्यात दोन दिवस सुरु करणे याबाबतचा विषय घ्यावा, अशी मागणीही संचालक गाडे व मापारी यांनी केली. संचालकांचे निवेदन प्राप्त झाले आहे. त्यानुसार हमाल, मापारी, अडते यांची तातडीची बैठक घेण्यात आली असून, या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच यशस्वी तोडगा काढण्यात येईल.- विजय देशमुख, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडMarket Yardमार्केट यार्ड