शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

बसमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे उन्हात हाल, तास-दीड तास खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 17:38 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) नादुरुस्त बसगाड्यांचा फटका वेळोवेळी प्रवाशांना बसत आहे.

वाशिम: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) नादुरुस्त बसगाड्यांचा फटका वेळोवेळी प्रवाशांना बसत आहे. त्यात महामार्गांच्या कामांमुळेही बसगाड्यांत बिघाड घडत असून, असाच प्रकार बुधवारी वाशिम-मंगरुळपीर मार्गावर पुन्हा घडला. तांत्रिक बिघाडामुळे बस बंद पडल्याने रखरखत्या उन्हात प्रवाशांना तास दीडतास त्रास सहन करावा लागल्याचे पाहायला मिळाले.एसटी महामंडळाच्या अनेक बसगाड्यांची अवस्था वाईट असतानाही पुरेशा पडताळणीअभावी त्या बसगाड्या मार्गावर धावताना दिसत आहेत. यामुळे ऐन प्रवासादरम्यान या बस बंद पडून प्रवाशांचा खोळंबा होतो. तसेच कधी पावसाळ्यात भर पाण्यात, कधी हिवाळ्यात थंडीत कुडकुडत, तर कधी उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात प्रवाशांना दुसºया बसची प्रतिक्षा करावी लागतेच शिवाय महत्त्वाच्या कामांसाठी जाणाºयांच्या अडचणीतही भर पडते. एसटी बसगाड्यांची अवस्था आधीच वाईट असताना महामार्गाच्या कामांत झालेल्या खाचखळग्यांमुळे बसमध्ये वारंवार बिघाड घडून बसगाड्या बंद पडण्याच्या घटनाही घडत आहेत. असा प्रकार पुन्हा एकदा बुधवारी वाशिम-मंगरुळपीर मार्गावर पाहायला मिळाला. कारंजा आगाराची औरंगाबाद-कारंजा ही एमएच-४० एक्यू-६३४४ ही बस बिटोडा भोयरपासून काही अंतरावर तांत्रिक बिघाडामुळे दुपारी १.३० वाजताच्या सुमारास बंद पडली. बसच्या चाकाला आधारासाठी असलेला स्प्रिंग पट्टा तुटल्याने ही बस थांबवावी लागली. महामार्गाच्या कामांसाठी आधीच मोठमोठी झाडे तोडली असताना बस बंद पडल्यानंतर प्रवाशांना उभे राहण्यासाठी सावलीचाही आधार नव्हता. त्यामुळे बसमधील प्रवाशांना तास दीड तास प्रवाशांना रखरखत्या उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. ------------चिमुकल्यांचे हाल कारंजा आगाराची बसगाडी वाशिम-मंगरुळपीर दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्यानंतर बसमधील प्रवाशांना रखरखत्या उन्हात उभे राहावे लागले. झाडांच्या सावलीचा आधार नसतानाच जवळपास घसा ओला करण्यासाठी पाण्याची सोयही नव्हती. त्यामुळे प्रवाशांसोबत असलेल्या चिमुकल्यांचे हाल झाल्याचे दिसले. एक चिमुकला उन्हाचा त्रास सहन होत नसल्याने रडत असल्याचेही यावेळी दिसले.