भारनियमनाने त्रस्त शेतकरी धडकले महावितरणवर!

By Admin | Updated: March 29, 2017 20:27 IST2017-03-29T20:27:11+5:302017-03-29T20:27:11+5:30

शेतकºयांनी बुधवार, २९ मार्च रोजी महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढून अधिक्षक अभियंता डी.आर.बनसोडे यांच्याकडे उद्भवलेली समस्या सोडविण्याची गळ घातली.

The burden of heavy loads of farmers is Mahavitaran! | भारनियमनाने त्रस्त शेतकरी धडकले महावितरणवर!

भारनियमनाने त्रस्त शेतकरी धडकले महावितरणवर!

वाशिम : अवास्तव भारनियमन, कृषीपंपांना अपुरा विजपुरवठा, वारंवार वीज खंडीत होणे आदी समस्यांनी मेटाकुटीस आलेल्या जिल्ह्यातील वारंगी, गोकसावंगी, रिधोरा, मुंगळा येथील शेतकऱ्यांनी बुधवार, २९ मार्च रोजी महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडक मोर्चा काढून अधिक्षक अभियंता डी.आर.बनसोडे यांच्याकडे उद्भवलेली समस्या सोडविण्याची गळ घातली.

वारंगी, गोकसावंगी, रिधोरा आणि मुंगळा या चार गावांमध्ये सद्या तब्बल १६ तास भारनियमन केले जात आहे. उर्वरीत ८ तासात २ ते ३ तासांपेक्षा अधिक वेळ विद्यूत पुरवठा अधूनमधून खंडित होतो. मेडशी येथील ३३ केव्ही क्षमतेच्या रोहित्रावर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असल्याने वारंवार विजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वारंगी आणि गोकसावंगी येथे नवीन फिडर बसविण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी लावून धरली. सदर मोर्चामध्ये शेतकरी अशोक दहात्रे, विनोद दहात्रे, धनंजय चतरकर, महादेव चतरकर, आनंद नाईक, शिवाजी केकन, संतोष दहात्रे, दलालधन दहात्रे, संतोष बोरचाटे, विजय उगले, अनिल इंगोले, शरद खंडागळे, बालाजी दहात्रे, बाबुराव चतरकर, दत्तराव बरवे, सुनिल कदम, नितेश देशमुख, किसन जाधव, निलेश दहात्रे, गजानन वानखडे, वैभव कदम, विजय हेंबाडे, अमोल निंबाळकर, संतोष कऱ्हाळे, बाळू कदम आदींसह इतर सहभागी झाले होते.

Web Title: The burden of heavy loads of farmers is Mahavitaran!