शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकवर शाळेतच झाडल्या गोळ्या, नेम चुकल्याने थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:27 IST

मुख्याध्यापकवर झाडल्या गोळ्या, नेम चुकल्याने थोडक्यात बचावले.

लोकमत न्युज नेटवर्क

वाशिम/ मालेगाव  : तालुक्यातील अमानी येथील जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख चंद्रकांत कानडे व मुख्याध्यापक विजय बोरकर यांच्यावर एका २५ वर्षीय युवकाने गोळ्या झाडुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवार २४ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने आरोपीचा नेम चुकल्याने अनर्थ टळला. फरार होण्याचा प्रयत्न करणारा आरोपी सुशांत समाधान खंडारे (२२) याला मालेगाव पोलिसांनी नाकाबंदी करून तात्काळ अटक केली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार अमानी जि.प. शाळेचे केंद्रप्रमुख चंद्रकांत कानडे, मुख्याध्यापक विजय बोरकर व सर्व शिक्षक स्टाफ हे नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता मुख्याध्यापक यांच्या कार्यालयात बसुन होते. सकाळी १०:३० च्या सुमारास  सुशांत समाधान खंडारे या युवकाने मुख्याध्यापकाच्या कार्यालयात प्रवेश करून अचानकच केंद्रप्रमुख कानडे यांच्या दिशेने गोळी झाडली. दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न करत असताना पिस्टलचा घोडा अडकल्यामुळे आरोपी दुसरी गोळी झाडु शकला नाही. वेळेवरच पिस्टलचा घोडा अडकल्याने आरोपीने त्याच्या जवळ असलेली दुसरी पिस्टल काढून पुन्हा गोळी चालवण्याचा प्रयत्न केला असता हा प्रयत्न मात्र शिक्षकांनी प्रसंगावधान राखून हाणुन पाडला.   शाळेवरीलच शिक्षकाने ‘सुपारी’ दिल्याचा आरोपीकडून उलगडाअमानी येथील जि.प. शाळेत पूर्वी गजानन इंगळे हे मुख्याध्यापक होते; परंतु त्यांचे मुख्याध्यापक पदाचे कामकाज समाधानकारक नसल्याने  त्यांच्या जागेवर विजय बोरकर यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केली होती. इंगळे यांची शालेय पोषण आहार मध्ये रक्कमही अडकून होती. त्यानंतर विजय बोरकर आणि गजानन इंगळे यांच्यात वारंवार वाद होत होते. या वादामधून शिक्षक इंगळे यांनी आरोपी सुशांत खंडारे याला केंद्रप्रमुख चंद्रकांत कानडे व मुख्याध्यापक विजय बोरकर यांना जिवे मारण्याची सुपारी दिल्याचे आरोपीने माहितीत सांगितले. त्यावरून शिक्षक गजानन इंगळे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी