शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या इमारतीची कळा बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 13:09 IST

वाशिम: जिल्ह्यातील पंचायत समित्यांतर्गत कार्यालयीन व निवासी इमारतींच्या दुरुस्तीसाठी ४५.३० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास १२ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार मंजुरी मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील पंचायत समित्यांतर्गत कार्यालयीन व निवासी इमारतींच्या दुरुस्तीसाठी ४५.३० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास १२ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार मंजुरी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील पंचायत समित्यांसह कर्मचाºयांच्या निवासस्थानांची कळा बदलणार आहे.राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८२ अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांतर्गत कार्यालयीन व निवासी इमारतींच्या दुरुस्तीसाठी १९ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास १२ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार मंजुरी मिळाली आहे. शासन निर्णयानुसार १९६१ च्या आणि पीआरबीमध्ये नोंद असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रशासकीय व निवासी इमारतींच्या देखभाल दुरुस्ती या निधीतून केली जाणार आहे. यात वाशिम जिल्ह्यातील इमारतींसाठी ४५.३० लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. यापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे मंजुरीबाबत जी कार्यपद्धती अवलंबिण्यात येत होती, तीच कार्यपध्दती अवलंबून कामे मंजूर करावी लागणार आहेत. इमारती देखभाल दुरुस्ती संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने विहित केलेले नियम व मार्गदर्शक सुचनांचे पालनही पंचायत समित्यांच्या दुरुस्तीची कामे या निधीतून करावी लागणार आहेत, तसेच, दुरुस्ती पुर्वीचे व नंतरचे फोटो जतन करुन ठेवावे लागणार आहेत. या निधीतून कामे करताना मंजूर कामाचे तुकडे न पाडता आवश्यकतेनुसार इ-निविदा कार्यपध्दतीचा अवलंब करुन कामाचे आदेश संबंधित विभागाला द्यावे लागणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील पंचायत समित्यांची प्रशासकीय कार्यालये आणि पंचायत समित्यांतर्गत येणाºया कर्मचाºयांच्या नादुरुस्त निवासस्थानांची अवकळा दूर होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमpanchayat samitiपंचायत समिती