लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारत संचार निगम लिमिटेड व इतर संघटनांच्या सहभागातून १२ व १३ डिसेंबर असे दोन दिवस पुकारलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपामध्ये अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग घेतला. बीएसएनएल कर्मचारी व अधिका-यांना तिसरा वेतन करार त्वरीत लागू करा, टॉवर उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णय रद्द करा, या व इतर मागण्यांसाठी हा दोन दिवशीय संप पुकारण्यात आला आहे. स्थानिक बीएसएनएलच्या कार्यालयासमोर १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरू करण्यात आलेल्या या लाक्षणिक संपामध्ये बीएसएनएलचे एसडीई जगनाडे, जेटीओ ठाकरे, एन.पी. तायडे, व्ही.व्ही. काळे, एस.डी. कांबळे, पी.वाय. सिरसाट, आर.एन. अहिरकर, आर.एम. दिवनाले, बी.एस. राठोड, पी.एच. जीतकर, ए.एस. गाभणे, पी.एन. दामोदर, व्ही.बी. मोहोड, संतोष जानोरकर, डाखोरे, एस.व्ही. ठाकुर, एस.एम. व्यवहारे, जे.पी. पवार आदी अधिकारी व कर्मचारी या संपात सामील झाले आहेत. या संपामुळे बीएसएनएलची सेवा प्रभावित झाली असून विभागातील कामे ठप्प पडली आहेत.
वाशिममधील बीएसएनलच्या अधिकारी, कर्मचार्यांचा देशव्यापी संपात सहभाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 19:22 IST
विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारत संचार निगम लिमिटेड व इतर संघटनांच्या सहभागातून १२ व १३ डिसेंबर असे दोन दिवस पुकारलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपामध्ये अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग घेतला.
वाशिममधील बीएसएनलच्या अधिकारी, कर्मचार्यांचा देशव्यापी संपात सहभाग!
ठळक मुद्देसेवा प्रभावितकर्मचारीविरोधी धोरणांचा निषेध