शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर ग्रामसेवक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात! मंगरूळपीर येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 15:01 IST

ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये वडिलांच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी मुलाला हजार रुपयांची लाच मागणाºया कोळंबी (ता.मंगरूळपीर) येथील ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने २३ फेब्रुवारीला मंगरूळपीर येथील शासकीय विश्रामगृहाजवळ रंगेहाथ अटक केली.

 वाशिम - ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डमध्ये वडिलांच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी मुलाला हजार रुपयांची लाच मागणाºया कोळंबी (ता.मंगरूळपीर) येथील ग्रामसेवकास लाचलुचपत विभागाने २३ फेब्रुवारीला मंगरूळपीर येथील शासकीय विश्रामगृहाजवळ रंगेहाथ अटक केली.याबाबत प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांनी सन २०१७ मध्ये शौचालय बांधकाम योजनेंतर्गत कोळंबी ग्रामपंचायतीत अर्ज केला होता. मात्र, यादरम्यान वडिलांचा मृत्यू झाल्याने शौचालयाचे अनुदान आईच्या नावावर वळते करायचे होते. त्यासाठी वडिलांच्या मृत्यूची नोंद ग्रामपंचायतीत आवश्यक असल्याने तक्रारदाराने कोळंबी येथील ग्रामसेवक जीवन शिंदे यांची भेट घेतली असता, शिंदे याने आपणास हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार २३ फेब्रुवारीला दाखल झाली. त्यावरून लाचलुचपत विभागाने पडताळणी केली. तसेच  सापळा रचला असता, शिंदेने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारल्याचे निष्पन्न झाले. यावेळी ग्रामसेवक शिंदे यास शासकीय विश्रामगृहासमोरील रोडवर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक करून तयच्याविरूद्ध कलम ७, १३ (१) (ड) कलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाहीत लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक सुनिता नाशिककर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक आर.व्ही.गांगुर्डे, नंदकिशोर परळकर, रामकृष्ण इंगळे, नितीन टवलारकर, अरविंद राठोड आदिंनी सहभाग नोंदविला. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारwashimवाशिम