शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी मागितली चार हजाराची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 16:30 IST

Washim Crime News पोलिसांनी पिंपळशेंडा (ता.मालेगाव) येथील तक्रारदारास चार हजाराची लाच मागितली.

ठळक मुद्देदोन पोलिसांसह खासगी इसम ताब्यात.पडताळणीदरम्यान लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

किन्हीराजा/वाशिम : किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या भांडणाच्या प्रकरणात प्राप्त तक्रारीवर पुढील कारवाई न करण्यासाठी पोलिसांनी पिंपळशेंडा (ता.मालेगाव) येथील तक्रारदारास चार हजाराची लाच मागितली. ८ नोव्हेंबर रोजी किन्हीराजा येथील एका हॉटेलमध्ये पंचासमक्ष लाच स्विकारली असून, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन पोलिसांसह एका खासगी इसमाला ताब्यात घेतले.तक्रारदाराची आई  व चुलत भावाच्या पत्नीत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याप्रकरणी तक्रारदाराच्या चुलत भावाच्या पत्नीने पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवर पुढे कोणतीही कारवाई न  करण्याकरीता पोलीस हवालदार गणेश गणपत नरवाडे (५१) व पोलीस कॉन्स्टेबल संतोष जगदेव गिºहे (३९) यांनी दोघेही रा. मालेगाव चार व्यक्तींचे मिळून एकूण चार हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. ८ नोव्हेंबर रोजी किन्हीराजा येथील एका हॉटेलमध्ये संतोष गिºहे यांनी लाचेची रक्कम ही खासगी इसम शुभम रमेश तिवारी (२१) रा. किन्हीराजा याच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितले. पंचासमक्ष आरोपीने लाचेची रक्कम स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपींविरूद्ध कलम ७, १२ लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी अमोल इंगोले व पथकाने पार पाडली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागwashimवाशिम