लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - स्थानिक पुसद नाका परिसरातील पंजाबी तडका या बियर बारचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ५० हजाराची विदेशी दारु व रोख ४ हजार असा एकुण ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २४ व २५ जुलैचे रात्रीदरम्यान घडली. पुसद नाका परिसरात गोपाल काठोळे यांचे पंजाबी तडका रेस्टारंट व बियर बार आहे. नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी ते गेले असता दुकानचे शटर तुटलेले दिसले. दुकानमधे जाऊन बघितले असता दुकानातील विदेशी दारुच्या बॉटल व रोख ४ हजार असे एकुण ५४ हजाराचा माल चोरीला गेल्याचे दिसून आले. याशिवाय चोरट्यांनी सीसी टिव्हीचे डिव्हीआर बॉक्सही लंपास केला. याप्रकरणी अद्याप पोलीस स्टेशनला नोंद नाही. दरम्यान, अलिकडच्या काळात शहर व परिसरात चोरी होण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहणे शहरवासियांना अपेक्षीत आहे.
बियर बारचे शटर तोडून ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 17:59 IST
वाशिम - स्थानिक पुसद नाका परिसरातील पंजाबी तडका या बियर बारचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी ५० हजाराची विदेशी दारु व रोख ४ हजार असा एकुण ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.
बियर बारचे शटर तोडून ५४ हजाराचा मुद्देमाल लंपास !
ठळक मुद्देपुसद नाका परिसरात गोपाल काठोळे यांचे पंजाबी तडका रेस्टारंट व बियर बार आहे. नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी ते गेले असता दुकानचे शटर तुटलेले दिसले. दुकानातील विदेशी दारुच्या बॉटल व रोख ४ हजार असे एकुण ५४ हजाराचा माल चोरीला गेल्याचे दिसून आले.