शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकार खोटारडेच नव्हे; तर महाभ्रष्टाचारी - आमदार राहुल बोंद्रे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 17:56 IST

वाशिम : राफेल घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून विद्यमान भाजपा सरकार खोटारडेच नव्हे; तर महाभ्रष्टाचारी असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे, अशी टिका काँग्रेस पक्षाचे पश्चिम विदर्भ प्रवक्ता तथा आमदार राहुल बोंद्रे यांनी येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राफेल घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून विद्यमान भाजपा सरकार खोटारडेच नव्हे; तर महाभ्रष्टाचारी असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे, अशी टिका काँग्रेस पक्षाचे पश्चिम विदर्भ प्रवक्ता तथा आमदार राहुल बोंद्रे यांनी येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.स्थानिक जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात राफेल घोटाळाप्रकरणी झालेल्या पत्रकार परिषदेस काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.दिलीपराव सरनाईक, माजी आमदार सुरेश इंगळे, माजी आमदार किसनराव गवळी, माजी जि.प.सदस्य राजू चौधरी, डॉ.सुधीर ढोणे, सेवादल जिल्हाध्यक्ष डॉ.विशाल सोमटकर, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष प्रा.अबरार मिर्झा,  बुलडाणा जि.प.सदस्य अशोकराव पडघान, पिरुभाई बेनिवाले, वाय.के.इंगोले,  प्रा.दादाराव देशमुख, माजी जि.प.सदस्य दिलीप देशमुख, महादेवराव सोळंके उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार बोंद्रे पुढे म्हणाले की, मोदी सरकारने राफेल खरेदीत ४१ हजार कोटी रुपयांचे देशाचे नुकसान केले. काँग्रेस शासनाच्या काळात ५२६.१० कोटी रुपयांची किंमत असलेल्या राफेलची खरेदी मोदी सरकारने १६७०.७० कोटी रुपये दराने केल्यामुळे या व्यवहारात ४१ हजार २०५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असे आमदार बोंद्रे म्हणाले. राफेल संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी चुकीची माहिती देवून सर्वोच्च न्यायालयाची फसवणुक केली. ज्वार्इंट पार्लमेंटरी कमिटीकडून चौकशीची मागणी काँग्रेसने लावून धरल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमRahul Bondreराहुल बोंद्रेcongressकाँग्रेस