शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ‘हेल्मेट’ वापरला चालकांचा कोलदांडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 15:17 IST

वाशिम : रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झालेली असतानाही, बहुतांश चालकांचा ‘विनाहेल्मेट’च प्रवास सुरू असल्याचे दिसून येते. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झालेली असतानाही, बहुतांश चालकांचा ‘विनाहेल्मेट’च प्रवास सुरू असल्याचे दिसून येते. रस्ता अपघात कमी करणे, दुचाकी अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दुचाकी वाहन चालकांसाठी ‘हेल्मेट’ सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने जानेवारी महिन्यापासून सुरू केली आहे. सुरूवातीला कारवाईची धडक मोहिम राबविली. त्यानंतर मार्च एन्डिंगला महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी या मोहिमेत थोडी शिथिलता येताच, चालकांनी हेल्मेट वापराकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता हेल्मेट वापरामुळे अपघातप्रसंगी चालकांनाच सुरक्षितता मिळेल, यात शंका नाही. जिल्ह्यात अडीच लाखापेक्षा अधिक दुचाकी वाहने असून, वाहन चालविताना अपघात झाल्यास डोक्याला गंभीर दुखापत किंवा मृत्यू ओढवू नये म्हणून हेल्मेटचा वापर कसा आवश्यक आहे, यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने रस्ता सुरक्षा पंधरवड्यादरम्यान मार्गदर्शनही केले आहे. हेल्मेटचा वापर केल्यास सुरक्षीत प्रवास कसा होऊ शकतो, हेदेखील पटवून देण्यात आले आहे. तथापि, अनेक चालकांनी हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष चालविल्याचे दिसून येत आहे. वाहनधारकांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने केले आहे.

टॅग्स :washimवाशिमtraffic policeवाहतूक पोलीस