शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

भगवानबाबा व भगवानगड यात राजकारण नको!-  धनंजय मुंडे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 20:04 IST

भगवानगडाच्या विषयात कुठलेही राजकारण व्हायला नको, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी १ सप्टेंबर रोजी येथे पार पडलेल्या संत भगवानबाबा सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्यात केले.

ठळक मुद्देसर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत भगवानबाबा, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते ना. धनंजय मुंडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : थोर महापुरूषांना कुठल्याही ठराविक चौकटीत अडकवून न ठेवता अठरापगड जातीतील लोकांनी सोबत येवून त्यांच्या कार्याचा जागर करायला हवा. भगवानबाबा हे देखील थोर महापुरूष होते. त्यामुळे त्यांच्या व भगवानगडाच्या विषयात कुठलेही राजकारण व्हायला नको, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी १ सप्टेंबर रोजी येथे पार पडलेल्या संत भगवानबाबा सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्यात केले.जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे होते. आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव जाधव, डॉ. जयश्री केंद्रे, चंद्रकांत ठाकरे, शिव व्याख्याते अशोक बांगर, विश्वनाथ सानप, श्याम बढे, वामनराव सानप, तहसीलदार राजेश वजीरे, बाजार समितीचे सभापती डॉ. प्रमोद नवघरे, उल्हासराव घुगे, बबनराव मिटकरी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत भगवानबाबा, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ना. धनंजय मुंडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना ना. मुंडे म्हणाले, की भगवानबाबांनी अध्यात्म व शिक्षणाची जोड देवून समाजसुधारणा करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी आयुष्यभर विठ्ठलाची वारी चुकू दिली नाह. वारकरी सांप्रदायाची मोठी चळवळ उभी करून गोहत्येसारख्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, असे त्यांनी सांगितले. विद्यमान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की आज याठिकाणी बॅनरवर आमच्या ताईचा फोटो असूनही मी आलो; परंतु पुढच्या जयंतीला बॅनरवर माझा फोटो टाका आणि तार्इंना बोलावून दाखवा. त्या येणार नाहीत, असा दावा त्यांनी यावेळी केला. तालुक्यातील डव्हा संस्थान हे पर्यटनस्थळ मंजूर झाले आहे. मात्र, अद्याप निधी आला नाही. त्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करा; विधानसभेत आवाज उठवून विकासकामांसाठी निधी मिळवून देण्याची जबाबदारी आपली असल्याचा शब्द त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. कार्यक्रमाचे संचालन मंगेश घुगे महाराज यांनी केले; तर आभार प्रदर्शन गणेश उंडाळ यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील पाच हजारांपेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने समाज कल्याण सभापती पानूबाई जाधव, उपसभापती गणपत गालट, सुनिता मिटकरी, भगवान शिंदे, नगराध्य्क्ष रेखा अरुण बळी, अमोल लादे, डॉ. नारायण शेंडगे, नितीन जाधव, सोनू शेळके, किसनराव घुगे आदिंचा समावेश होता.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMalegaonमालेगांवwashimवाशिम