शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, ‘स्क्रीन टायमिंग’ने वाढतोय अंधूकपणा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 18:09 IST

‘मायोपिया’ म्हणजे अंधूक दिसण्याची समस्या असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगितले जात आहे. 

वाशिम : कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम, स्कूल फ्रॉम होम यामुळे ‘स्क्रीन टायमिंग’ वाढला आहे. परिणामी, जिल्ह्यातही ‘मायोपिया’ म्हणजे अंधूक दिसण्याची समस्या असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगितले जात आहे. कोरोनामुळे सर्व जगच बदलून जात आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  मार्च ते मे या महिन्यात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी झाली. या दरम्यान पालकांसह विद्यार्थीदेखील घरीच होते. त्यामुळेर् िटव्ही बघणे, संगणक, लॅपटॉप, मोबाईल आदीचा वापर वाढला. कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना अंमलात आली. अनेकजणांनी घरी राहूनच शासकीय, निमशासकीय कामकाज हे मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून केले. आजही काही जण ‘वर्क फ्रॉम होम’नुसार काम करतात. विद्यार्थीदेखील आॅनलाईन वर्गामुळे अधिकाधिक वेळ संगणक, मोबाईलचा वापर करतात. एकंदरित पूर्वीच्या तुलनेत आता ‘स्क्रीन टायमिंग’ वाढल्याने आपसूकच डोळ्याच्या समस्याही निर्माण होत आहे. स्क्रीन टायमिंगने अंधूकपणा वाढविला आहे. जवळच्या वस्तू सहज दिसत असल्या तरी दूरचे दिसत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. संगणक, मोबाईल, लॅपटॉप, टिव्हीचा मर्यादेपेक्षा जास्त वापर, जीवनसत्वयुक्त आहाराचा अभाव, नियमित व्यायामाकडे दुर्लक्ष यामुळे मायोपिया आजार वाढत असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे. डोळ्यांचे स्नायू कमकुवत होण्यामुळेदेखील मायोपिया होऊ शकतो, असे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले. मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टिव्ही आदीचा मर्यादेपक्षा जास्त वापर झाला तर डोळ्याच्या समस्या निर्माण होतात. चष्म्याच्या नंबर वाढणे, अंधूकपणा, डोळ्यात कोरडेपणा जाणवणे, डोळ्यात आग होणे अशा समस्या जाणवतात. मोबाईल, संगणक, लॅपटॉपचा वापर हा मर्यादेतच असावा.- डॉ. दीपक शेळके,नेत्रतज्ज्ञ वाशिम ‘स्क्रिन टायमिंग’ वाढल्याने अंधूकपणा यासह डोळ्याच्या विविध समस्या निर्माण होत असल्याचे रुग्ण येत आहेत. डोळ्याच्या समस्या टाळण्यासाठी ‘स्क्रिन टायमिंग’वर नियंत्रण असणे आवश्यक आहे. याबरोबरच जीवनसत्वयुक्त आहार, नियमित व्यायामही असावा.- डॉ. स्वीटी गोटे,

टॅग्स :washimवाशिमeye care tipsडोळ्यांची काळजीHealthआरोग्य