शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या माजी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा एकरकमी लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 15:16 IST

वाशिम : राज्य परिवहन महामंडाळाने ( एसटी ) त्यांच्या कर्मचाºयांना ३० जून २०१८ पासून वेतनवाढ दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य परिवहन महामंडाळाने ( एसटी ) त्यांच्या कर्मचाºयांना ३० जून २०१८ पासून वेतनवाढ दिली आहे. या वेतनवाढीचा लाभ निवृत्ता, बडतर्फ, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ' किंवा इतर कोणत्याही कामामुळे सेवेतून कमी झालेल्या कर्मचाºयांनाही मिळणार असून, सदर कर्मचाºयांना त्याचा एकरकमी लाभ देण्याचे निर्देश महामंडळाने ५ फेब्रुवारीच्या परिपत्रकान्वये दिले आहेत.एसटी महामंडळाने त्यांच्या कर्मचाºयांना ३० जून २०१८ पासून वेतनवाढ लागू केली असून, याचा लाभ कार्यरत कर्मचाºयांना मिळणार आहे. त्याशिवाय निवृत्त, स्वेच्छानिवृत्त, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र, मृत्यू आदि कारणांमुळे सेवेतून कमी झालेल्या कर्मचाºयांना या वेतनवाढीनुसार त्यांच्या देय रकमा अदा करण्याबाबत ६ नोव्हेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार सुचनाही देण्यात आल्या आहेत. या रकमा अदा करण्यासाठी महामंडळाने नव्याने सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यात कोणत्याही कारणास्तव एसटीच्या सेवेतून कमी झालेल्या कर्मचाºया कर्मचाºयांना वेतनवाढीमुळे रजा रोखीकरण आणि उपदानातील फरक एकरकमी देणे, वेतनवाढीतील फरक हा कर्मचारी वर्ग खाते अन्वये सेवेत असणाºया कर्मचºयांप्रमाणेच समान ४८ हफ्त्यांत परिगणना करून त्यापैकी ५ हफ्त्यांची रक्कम तात्काळ अदा करण्यासह महामंडळाच्या भविष्य निर्वाह निधीच्या अंशदान रकमेतील फरक समान ४८ हफ्त्यांत वेतनाच्या फरकासोबत अदा करण्याच्या सुचनांचा समावेश होता. आता त्यात सुधारणा करून सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त, बडतर्फ, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र, मृत्यू आदि कारणांमुळे महामंडळाच्या सेवेतून कमी झालेल्या कर्मचाºयांना महामंडळाच्या या संदर्भात २०१८ मधील परिपत्रक क्रमांक २७ नुसार वेतनवाढीमुळे रजा रोखीकरण आणि उपदानातील व वेतनातील फरक, तसेच भविष्य निर्वाह निधी अंशदान रकमेतील फरक हा कर्मचारी वर्ग खाते क्रमांक ३५/२०१८ व ४१/२०१८ अन्वये परिगणना करून एकरकमी देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच वरील कर्मचाºयांना यापूर्वी हफ्याने अदा करण्यात आलेली रक्कम समायोजित करून उर्वरित सर्व देय रक्कम ही एकरकमी देण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमstate transportराज्य परीवहन महामंडळ