शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

लाभार्थींना बागायती जमिनीचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:41 IST

बागायती शेती उपलब्ध झाली नसल्याने लाभार्थींना कोरडवाहू (जिरायत) शेतीवरच समाधान मानावे लागले.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत मागील १४ वर्षात एकदाही बागायती शेती उपलब्ध झाली नसल्याने लाभार्थींना कोरडवाहू (जिरायत) शेतीवरच समाधान मानावे लागले. या १४ वर्षात चार वेळा कोरडवाहू शेतीही उपलब्ध झाली नाही तर उर्वरीत १० वर्षात २४० लाभार्थींना ९२९ कोरडवाहू शेतीचे वाटप करण्यात आले.गोरगरीब व भूमिहीन लाभार्थींचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी समाजकल्याण विभाग विविध योजना राबवित आहे. त्यापैकीच एक असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना ४ एकर जिरायत किंवा २ एकर बागायत जमीन उपलब्ध करून देण्यात येते. जमिन खरेदीसाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान तर उर्वरीत ५० टक्के रक्कम १० वर्षासाठी बिनव्याजी स्वरुपात दिली जाते. पात्र लाभार्थींना जमिन देण्यासाठी शासनाकडून शासकीय दरात प्रथम जमीन खरेदी केली जाते. जमीन विकण्यासाठी कुणी तयार झाला तर लाभार्थींना जमीन दिली जाते.२००४ -०५ ते २०१८-१९ या १४ वर्षात बागायती शेती विकण्यासाठी एकाही शेतकºयंचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाला नाही किंवा तसे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे १४ वर्षात एकदाही बागायती शेती उपलब्ध होऊ शकली नाही. चार वर्षात कोरडवाहू शेतीदेखील उपलब्ध झाली नाही तर १० वर्षात ९२९ एकर कोरडवाहू शेती उपलब्ध झाल्याने २४० लाभार्थींना ईश्वर चिठ्ठीद्वारे वाटप करण्यात आली, असे समाजकल्याण विभागाने वरिष्ठ निरीक्षक अनंत मुसळे यांनी सांगितले.बागायती शेती विक्री करण्यासाठी कोणताही शेतकरी अद्याप पुढे आला नसल्याने बागायती शेती उपलब्ध होऊ शकली नाही, असा दावा समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी