शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 14:55 IST

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दोन युवकांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर चढून २२ जुलै रोजी घंटानाद आंदोलन छेडले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मंगरूळपीर व कामरगाव येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दोन युवकांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर चढून २२ जुलै रोजी घंटानाद आंदोलन छेडले. शिक्षणाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनामुळे सदर आंदोलन स्थगित करण्यात आले.मंगरूळपीर व कामरगाव येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय येथे गोरगरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. गत काही वर्षांपासून या दोन्ही कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व अन्य विषय शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी वारंवार करण्यात आली. परंतू, अद्याप याकडे लक्ष दिले नसल्याने शेवटी २२ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन सुर्वे व विशाल ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर चढून घंटानाद आंदोलन छेडले.याची दखल घेत सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी रुपेश निमके, वरिष्ठ सहायक प्रवीण राऊत, शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी गजानन खूळे, उपशिक्षणाधिकारी डाबेराव यांनी आंदोलकांशी चर्चा केली. जि.प.कनिष्ठ महाविद्यालयात रिक्त पदाची भरती करण्यासंदर्भात पवित्र प्रणालीमार्फत जाहिरात प्रसिद्ध केली असून, याबाबतची कार्यवाही शासनस्तरावरून सुरू आहे. घड्याळी तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात वाशिम, कामरगाव, मंगरूळपीर, उंबर्डाबाजार, विठोली येथील कनिष्ठ महाविद्यालयात १३ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे आंदोलकांना सांगितले. त्यामुळे सदर आंदोलन स्थगित केले.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदagitationआंदोलन