महिलेस मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:47 IST2021-08-17T04:47:24+5:302021-08-17T04:47:24+5:30

शिरपूर जैन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेलखेड येथील गणेश खिल्लारी हा पत्नी स्वाती हिस मुलगा होत नाही व किराणा ...

Beating women; Crime against husband | महिलेस मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा

महिलेस मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा

शिरपूर जैन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेलखेड येथील गणेश खिल्लारी हा पत्नी स्वाती हिस मुलगा होत नाही व किराणा दुकान लावण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावून मारहाण करीत होता. १२ जुलै ते १२ ऑगस्टदरम्यानसुद्धा गणेशने गर्भवती स्वाती पोटावर थापड-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे स्वातीला पोटाचा त्रास होऊ लागला. तिला उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तिच्या पोटात असलेल्या जुळे गर्भ खराब झाल्याचे सांगितले. त्यामुळे स्वातीला गर्भपात करावा लावला. जन्माला येणाऱ्या दोन बाळांच्या मृत्यूस पती गणेश हा कारणीभूत ठरल्याची व माहेरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद १४ ऑगस्ट रात्री स्वातीने शिरपूर पोलिसँत दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३१५, ३१६, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांच्या मार्गदर्शनात अजय महाले हे करीत आहेत.

Web Title: Beating women; Crime against husband