शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सावधान ! सततचा पाऊस देतोय जलजन्य आजारांना आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:48 IST

००००००००००००००० दूषित पाण्यामुळे होणारे आजार १) डायरिया, गॅस्ट्रो : डायरिया, गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर ...

०००००००००००००००

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

१) डायरिया, गॅस्ट्रो : डायरिया, गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणं दिसू लागतात. पावसाळ्यात ही लक्षणं साथीच्या आजारासारखी पसरतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते.

००००००००००००००००

२) कावीळ : दूषित पाण्यामुळे कावीळ आजार होतो. त्यात हेपेटायटिस 'ए' किंवा 'इ' हे प्रकार झाल्याचे आढळतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर सात ते आठ दिवसांत उलट्या, ताप, लघवी पिवळी होणे किंवा भूक मंदावणं ही लक्षणे दिसतात. चार ते पाच दिवसांनी डोळे पिवळे दिसायला लागतात.

००००००००००००००००

३) टायफॉइड : टायफॉइड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. चार ते पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखते. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगावण्याची भीती असते.

००००००००००००००००

आसेगावात डायरियाचे शंभरवर रुग्ण

गेला आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरात पिण्याचे पाणी दूषित होऊन डायरियाचा उद्रेक झाला आहे. बहुतांश ठिकाणी डायरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. शंभरपेक्षा अधिक लोकांना या आजाराची लागण झाली आहे. त्यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी दवाखान्यात उपचारासाठी गर्दी उसळत आहे.

००००००००००००००००००००

कोट: आसेगावात डायरियाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. तेथे तपासणी मोहीम सुरू आहे. ग्रामसेवकांनी प्रत्येक गावांत जलसुरक्षकांच्या मदतीने पिण्याच्या जलस्त्रोतात ब्लिचिंग पावडर टाकून घ्यावे. ग्रामस्थांनी पाणी गाळून, उकळून प्यावे. काही गावांत आरोग्य केंद्र नसेल, तर आवश्यकतेनुसार शिबिरही घेतले जाईल.

-डॉ. अविनाश आहेर,

जिल्हा आरोग्य अधिकारी

०००००००००००००००००००

ही घ्या काळजी !

- पावसाळ्यात पाणी पिताना शुद्ध करून पिणे हा सर्वोत्तम उपाय.

- वॉटर प्युरी फायरचे पाच ते सहा थेंब पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात टाकावेत. ते

- हॉटेलमधील उघडे पदार्थ, बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे.

-पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.

-उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यावेळी मीठ-साखर पाणी सतत पित राहावं.

-ओआरएस पावडर एक लिटर पाण्यात टाकून प्यावी.

- शक्य असेलर नारळाचे पाणी घ्यावे.