शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

बाप्पांचे आज आगमन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:25 IST

वाशिम: जिल्हय़ात शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी सर्वत्र गणेशांची विधिवत स्थापना केली जाणार आहे. पुढील १0 दिवस चालणार्‍या या उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनही सज्ज झाले असून, वरिष्ठ अधिकार्‍यांसह १५00 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या उत्सवावर वॉच ठेवणार आहेत. शहरी भागात २४५ तर ग्रामीण भागात ४४१ अशा एकंदरीत ६८६ सार्वजनिक गणेश मंडळांकडून ‘श्रीं’ची स्थापना केली जाणार आहे. यापैकी २१0 गावांत ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना होणार आहे. 

ठळक मुद्दे६८६ सार्वजनिक गणेश मंडळांची होणार स्थापना १५00 पोलीस कर्मचार्‍यांचा वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हय़ात शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी सर्वत्र गणेशांची विधिवत स्थापना केली जाणार आहे. पुढील १0 दिवस चालणार्‍या या उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनही सज्ज झाले असून, वरिष्ठ अधिकार्‍यांसह १५00 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या उत्सवावर वॉच ठेवणार आहेत. शहरी भागात २४५ तर ग्रामीण भागात ४४१ अशा एकंदरीत ६८६ सार्वजनिक गणेश मंडळांकडून ‘श्रीं’ची स्थापना केली जाणार आहे. यापैकी २१0 गावांत ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना होणार आहे. सुखकर्ता, दुख:हर्ता गणरायांच्या स्वागतासाठी जिल्हावासी सज्ज आहेत. गणेशोत्सव शांततेत साजरा होण्यासाठी पोलीस प्रशासनानेदेखील पोलीस यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक अपर पोलीस अधीक्षक, दोन पोलीस उपअधीक्षक, १९ पोलीस निरीक्षक, ७0 सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १0३२ पोलीस कर्मचारी, ४00 होमगार्ड, एसआरपीएफ कंपनी, दोन दंगा नियंत्रण पथक व एक अतिजलद प्रतिसाद पथक असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबरच गुन्हेगारी टोळीविरुद्ध पथक सक्रिय करण्यात आले आहे.घरगुती गणरायांसोबतच सार्वजनिक गणेश मंडळे विविध ठिकाणी बसविणार्‍या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी सज्ज झाली आहेत. यावर्षी एकूण ६८६ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना होणार आहे. यामध्ये शहरी भागातील २४५ आणि ग्रामीण भगातील ४४१ गणेश मंडळांचा समावेश आहे. यापैकी २१0 गावांत एक गाव, एक गणपतीची स्थापना होणार आहे. गतवर्षी जिल्हय़ात ६३९ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली होती. यावर्षी ४७ ने गणेश मंडळांची संख्या वाढल्याचे दिसून येते.वाशिम शहरासह जिल्हय़ात प्रत्येक शहरात गणरायांचे आगमन आणि विसर्जन ही गणेशभक्तांसाठी एक मोठी पर्वणी असते. रस्ते दुरुस्ती, परवाने, होर्डिंग्ज आणि कायदा व सुव्यवस्था या विषयांवर समन्वय साधून सेवा-सुविधांची व्यवस्था करण्यात आल्याचा दावाचा प्रशासनाने केला. वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर व मानोरा शहरातील गणेशभक्तांनी गणरायांच्या मुक्कामासाठी मंडप सजावटीची तयारी पूर्ण केली आहे. महागाईची झळ सोसूनही विविध प्रकारच्या मूर्तींची ‘बुकिंग’ करण्यात आलेली आहे. यावर्षी ‘जीएसटी’मुळे १५ टक्के महागाईची झळ सोसून मूर्ती बनविण्याचे काम केले, अशी माहिती वाशिम येथील मूर्तिकार राजेश पेंढारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. वाशिम येथे डॉ. आंबेडकर चौक ते नगर परिषद चौक मार्गाच्या दोन्ही रस्त्यालगत गणरायांच्या मूर्तीची दुकाने असून, गुरुवारी सायंकाळी या मूर्तींची बुकिंग करण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.