शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

‘बेबी केअर कीट’ची योजना कागदोपत्रीच झाली लागू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 15:37 IST

वाशिम : ‘बेबी केअर कीट’ योजनेची अंमलबजावणी २६ जानेवारीपासून होणार होती. मात्र, नियोजित दिवशी या योजनेसंदर्भात कुठेही प्रचार-प्रसिद्धी झाली नाही किंवा साहित्य देखील मिळाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रसुतीनंतर जन्माला येणाऱ्या बालकांना सुरक्षेच्या दृष्टीकोणातून ठराविक साहित्यांचा पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुषंगाने राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये जन्मणाºया बालकांना २ हजार रुपये किंमतीचे साहित्य असलेली ‘बेबी केअर कीट’ पुरविण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी २६ जानेवारीपासून होणार होती. मात्र, नियोजित दिवशी या योजनेसंदर्भात कुठेही प्रचार-प्रसिद्धी झाली नाही किंवा साहित्य देखील मिळाले नाही. विशेष म्हणजे या योजनेबाबत प्रशासकीय यंत्रणाही अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयांमध्ये गरोदरपणीच नाव नोंदणी केलेल्या व त्याचठिकाणी प्रसुत झाल्यानंतर २ महिन्याच्या आत अर्ज सादर करणाºया महिलांना पहिल्या प्रसुतीच्या वेळी मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतर नवजात बालकाचे कपडे, प्लास्टिक लंगोट, झोपण्याची लहान गादी, टॉवेल, तापमापक यंत्र, २५० मीली अंगाला लावायचे तेल, मच्छरदाणी, छोट्या आकाराचे ब्लँकेट, लहान प्लास्टिकची चटई, ६० मीली शाम्पू, खेळणी-खुळखुळा, नख काढण्याकरिता नेलकटर, हातमोजे-पायमोजे, आईसाठी हात धुण्याचे लिक्विड, लोकरीचे कापड, बॉडी वॉश लिक्विड आदी साहित्यांची ‘बेबी केअर कीट’ पुरविली जाणार असल्याचा शासन निर्णय डिसेंबर २०१८ मध्ये पारित झाला. त्याची अंमलबजावणी प्रजासत्ताकदिन अर्थात २६ जानेवारीपासून करण्याचे शासनाचे निर्देश होते. मात्र, २६ जानेवारीला या योजनेचा कुठेही प्रचार-प्रसार झाला नाही. महिला व बालविकास अधिकारी किंवा तालुका आरोग्य अधिकाºयांनाही यासंदर्भात कुठलेही निर्देश नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. बालमृत्यू दर कमी करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये जन्माला येणाºया बालकांना ‘बेबी केअर कीट’ पुरविण्यात येणार असल्याचा शासन निर्णय प्राप्त झाला. मात्र, २६ जानेवारीला नेमक्या कुठल्या पद्धतीने योजनेच्या अंमलबजावणीस सुरूवात करायची, याबाबत कुठलेही निर्देश प्राप्त झालेले नव्हते. शासनाच्या आदेशानुसार पुढची कार्यवाही केली जाईल.- नितीन मोहुर्लेमहिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्यgovernment schemeसरकारी योजना