महाआवास अभियानांतर्गत जनजागृती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:37 AM2021-01-18T04:37:06+5:302021-01-18T04:37:06+5:30

०० ३० जणांवर दंडात्मक कारवाई रिठद : मास्कचा वापर न करता दुचाकी चालविताना आढळून आल्याने वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ...

Awareness under Maha Awas Abhiyan! | महाआवास अभियानांतर्गत जनजागृती !

महाआवास अभियानांतर्गत जनजागृती !

Next

००

३० जणांवर दंडात्मक कारवाई

रिठद : मास्कचा वापर न करता दुचाकी चालविताना आढळून आल्याने वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या चमूने मोहजा, रिठद परिसरात रविवारी ३० जणांवर दंडात्मक कारवाई केली. मास्कचा वापर करण्याच्या सूचना ठाणेदार संजय शिपने यांनी दिल्या आहेत.

०००००

स्वयंरोजगारासंदर्भात आज मार्गदर्शन

जऊळका रेल्वे : युवा सप्ताहांतर्गत १८ जानेवारी रोजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांत युवांसाठी नोकरी, व्यवसाय, रोजगार व स्वयंरोजगार इत्यादीबाबत ऑनलाईन मार्गदर्शन केले जाणार आहे.

००

मतमोजणी काळात वाहतूक मार्गात बदल

वाशिम : मतमोजणी काळात १८ जानेवारी रोजी वाशिम, रिसोड येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. वाशिम येथील बसस्थानकानजीकची वाहतूक सिव्हिल लाईनमार्गे वळविली जाईल. रिसोड येथे सिव्हील लाईन रोडवरील बसस्थानक मागील लॉज ते बसस्थानक वॉल कंपाऊंडपर्यंत मेडिकलपर्यंतचा मार्ग मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत वाहतूक व रहदारीकरिता बंद करण्यात आला.

Web Title: Awareness under Maha Awas Abhiyan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.