शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, महाविद्यालयांमध्ये लोकशाहीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 17:36 IST

२५ सप्टेंबरपासून शालेय परिपाठामध्ये विद्यार्थ्यांना मतदान व लोकशाही विषयी माहिती दिली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभा निवडणुकीत जास्ती जास्त मतदारांनी सहभागी व्हावे, याकरिता शाळा, महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. २५ सप्टेंबरपासून शालेय परिपाठामध्ये विद्यार्थ्यांना मतदान व लोकशाही विषयी माहिती दिली जात आहे.३० सप्टेंबर रोजी सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये वयोगटानुसार चित्रकला, रांगोळी स्पर्धा व मतदार जागृतीविषयक घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ आॅक्टोंबर रोजी सकाळी प्रभातफेरीचे आयोजन करून मतदार जागृती केली जाणार आहे. ७ आॅक्टोंबर रोजी सर्व शाळा व महाविद्यालयात निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. ९ आॅक्टोंबर रोजी सर्व विद्यार्थी आपल्या पालकांना पत्र लिहून मतदानाचे महत्व पटवून देणार आहेत. लोकशाही आणि निवडणूक, मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ११ आॅक्टोंबर रोजी वक्तृत्व व परिसंवाद स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. मतदान, लोकशाही बळकटीकरण आदी विषयवार ३० सप्टेंबर ते १८ आॅक्टोंबर या कालावधीत आठवडी बाजाराची ठिकाणे, गदीर्ची ठिकाणे, चौक येथे पथनाट्य सादर करून मतदार जागृती केली जाणार आहे. १७ आॅक्टोंबर रोजी शाळांमध्ये अभिरूप मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.मतदार जागृतीसाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवून मतदार जागृतीच्या कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप समितीचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना, माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी