शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापरातून पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 11:31 IST

Washim News वाशिम जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाने ‘ओल्ड बुक बँक’ अभियान राबविण्याची तयारी केली आहे.  

ठळक मुद्दे‘ओल्ड बुक बँक’ हे अभियान राबविण्याची तयारी केली आहे.जबाबदारी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पाठ्यपुस्तक निर्मितीतून होणारी हानी टाळण्यासाठी राज्य सरकारने पाठ्यपुस्तकांच्या पुनर्वापराची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार वाशिम जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाने ‘ओल्ड बुक बँक’ अभियान राबविण्याची तयारी केली आहे.  समग्र शिक्षा योजनेंतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. यासाठी राज्य शासनाला दरवर्षी सुमारे २०० कोटी रुपयांंपेक्षा अधिक खर्च करावा लागतो. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पाठ्यपुस्तकांपैकी काही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांची योग्यरीतीने जपणूक करतात व त्यांना सुस्थितीत ठेवतात. अशा पाठ्यपुस्तकांचे संकलन करून त्याचा पुनर्वापर केल्यामुळे कागदाची बचत होईल आणि पर्यायाने कागद निर्मितीतून होणारा पर्यावरणाचा ºऱ्हासही थांबेल, हा विचार करून राज्यशासनाने पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचा निर्णय ८ डिसेंबर रोजी घेतला आहे. राज्य शासनाच्या या प्रकल्पानुसार वाशिम जिल्हा परिषदेने जिल्ह्यात ‘ओल्ड बुक बँक’ हे अभियान राबविण्याची तयारी केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ओल्ड बुक बँक अंतर्गत गतवर्षीच्या सत्रात विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या पुस्तकांचे संकलन करून त्यातील सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचे वितरण पुढील सत्रात केले जाणार आहे. 

गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना सूचनाशासनाच्या पाठ्यपुस्तक पुनर्वापर या पथदर्शी प्रकल्पानुसार जिल्ह्यात ‘ओल्ड बुक बँक’ अभियानांतर्गत गतवर्षीच्या सत्रातील पुस्तकांचे संकलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करून सुस्थितीत असलेल्या पुस्तकांची जपणूक  करून ते पुढील वर्षी विद्यार्थ्यांना वितरित करण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. या संदर्भात सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखांसह मुख्याध्यापकांना सूचनाही जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने दिल्या आहेत. 

इतरही विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचे आवाहन राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांना गतसत्रात मोफत पुस्तके वितरित करण्यात आली. त्यांच्याकडील चांगल्या स्थितीत असलेल्या पुस्तकांचे संकलन जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून केले जाणार आहेच. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांनी गतवर्षी बाजारातून पुस्तके विकत घेतली अशा विद्यार्थ्यानीही चांगल्या स्थितीतील पुस्तके संबंधित शाळेत देऊन पर्यावरण रक्षणात हातभार लावावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. 

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पाठ्यपुस्तक पुनर्वापर या पथदर्शी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ओल्ड बुक बँक’ हे अभियान राबविले जाणार आहे. यात गतवर्षी मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमातील पुस्तकांचे संकलन करून योग्यस्थितीतील पुस्तकांचे पुन्हा वाटप केले जाईल. इतरही विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडील चांगल्या स्थितीतील पुस्तके शाळात जमा करून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावावा.-गजाननराव डाबेराव,  प्र. उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. वाशिम 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी