शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच हजाराची लाच स्विकारताना सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:50 IST

सुभाष नागोराव सुखदेवे व सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दिनेश खोपे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू  होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नायलॉन जाळ्यांच्या अनुदानाचा धनादेश देण्यासाठी पाच हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दिनेश रामभाऊ खोपे यास मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) कार्यालय वाशिम येथून ११ जून रोजी रंगेहात ताब्यात घेतले. लाचप्रकरणी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सुभाष नागोराव सुखदेवे व सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दिनेश खोपे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू  होती.मत्स्य व्यवसायाकरीता नायलॉन जाळीसाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान दिले जाते. तक्रारदार हे एका मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष असून त्यांच्या संस्थेंतर्गत १५ सभासदांना नायलॉन जाळ्याचे वाटप झालेले आहे. ५० टक्के अनुदान मिळण्यासाठी मत्स्य व्यवसाय अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. ५० टक्के अनुदानाचा धनादेश देण्यासाठी सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) कार्यालय वाशिमचे अधिकारी सहा हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिमकडे केली होती. या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी २ मे रोजी पडताळणी केली असता मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सुभाष सुखदेवे व सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दिनेश खोपे यांनी तडजोडीअंती ५५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ११ जून रोजी वाशिम येथील कार्यालयात सापळा रचला असता, दिनेश खोपे यास तक्रारादाराकडून ५५०० रुपये लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित २०१८) कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निवृत्ती बोºहाडे, पोलीस निरीक्षक ए.पी.इंगोले, पोलीस कर्मचारी  नितीन टवलारकर, दिलीप बेलोकार, अरविंद राठोड, विनोद अवगळे आदींनी पार पाडली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागwashimवाशिम