शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

आशा वर्कर्स अवैध वसुली; चौकशीचा मुहूर्त निघाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

आशा वर्कर्सकडुन छापील रजिस्टर देताना आर्थिक देवाणघेवाण केल्याचा अहवाल वाशिमचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोपवला ...

आशा वर्कर्सकडुन छापील रजिस्टर देताना आर्थिक देवाणघेवाण केल्याचा अहवाल वाशिमचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोपवला होता. त्या आधारावर जिल्हा समूह संघटक अनिल उंदरे आणि तालुका समूह संघटक राहुल धमेरिया यांना त्यांच्या पदावरून तात्पुरते कार्यमुक्त केले. या दोघांची कार्यमुक्ती तात्पुरती करावयाची किंवा कायमस्वरूपी करावयाची याशिवाय इतर तालुक्यातील तालुका संघटक व गट प्रवर्तक यामध्ये दोषी आढळतात काय याची चाचपणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या त्रिसदस्यीय समितीच्या चौकशीसाठी प्रत्येक तालुक्यातील आशा वर्कर्स यांना त्यांच्या तालुका स्तरावरील पंचायत समिती सभागृहात बोलविण्यात येणार आहे. यासाठी मालेगाव तालुक्यातील चौकशी १५ सप्टेंबरला, वाशिम तालुक्यातील चौकशी १७ सप्टेंबरला, रिसोड तालुक्यातील चौकशी २१ सप्टेंबरला, मंगरुळपीर तालुक्यातील चौकशी २४ सप्टेंबरला, मानोरा तालुक्यातील चौकशी २८ सप्टेंबरला तर कारंजा तालुक्यातील चौकशी १ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. या त्रिसदस्यीय समितीसमोर आशा वर्कर्सनी केलेली तक्रार ग्राह्य धरूनच दोषींवर कार्यवाही होणार आहे.

०००००००

आशा वर्कर्सवर दबाव आणण्याचा प्रयत्न

आशा स्वयंसेविकाकडुन विविध कारणे समोर करून पैसा वसुलीचा गोरखधंदा करणाऱ्यांनी आपली एक साखळी निर्माण करून आशा वर्कर्स यांना आपल्या बाजूने जबाब नोंदविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बºयाच ठिकाणी आशांकडुन घेतलेली रक्कम परत करण्याचीही धावपळ सुरू झाली आहे. परंतु आशा वर्कर्सनी या महाभागांना जर या प्रकरणात मदत केली तर त्यांचे पुढील भविष्य मात्र अंधकारात जाणार हे तितकेच सत्य.

००००

‘त्या’ बीसीएमच्या आशांना धमक्या

मानोरा तालुक्यातील बीसीएम (तालुका समूह संघटक) ने आशांच्या घरोघरी जाऊन त्यांना दिलेले रजिस्टर परत घेतले आहेत. याशिवाय सन २०१५ मध्येही या बीसीएमने प्रत्येकी ५०० रुपये घेऊन एक रजिस्टर दिले होते. सर्व आशांच्या भेटी घेऊन या बीसीएमने चौकशी समितीजवळ रजिस्टर व पैसे घेतले नाही असा खोटा जबाब नोंदविण्यासाठी दबाव टाकला आहे. याशिवाय पंतप्रधान मातृवंदना योजना अंतर्गत लाभार्थ्यांचे खात्यामध्ये अद्यापही पैसे आलेले नाहीत. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आशा स्वयंसेविकांनी लेखी स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे. या तक्रारीचीही चौकशी होणे महत्वाचे आहे.