शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

वनपरिक्षेत्रातील नववर्षाच्या पार्ट्यांवर आसेगाव पोलिसांचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 15:08 IST

आसेगाव पोलिसांच्यावतीने परिसरातील जंगली भागांत ३१ डिसेंबरच्या रात्री होणाºया पार्ट्यांवर वॉच ठेवला जाणार असून, युवा पिढीने नववर्षाचे स्वागत मद्यप्राशनाने न करता मिष्टान्न वाटून करावे, असे आवाहन ठाणेदार रऊफ शेख यांनी केले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पो. स्टे. (वाशिम) : नव वर्षाच्या स्वागतासाठी अनेक युवक रात्रीच्या वेळी जंगली भागात मेजवाणीची तयारी करतात. अशा प्रकारातून अप्रिय घटना घडण्याची भिती असते, या पृष्ठभूमीवर आसेगाव पोलिसांच्यावतीने परिसरातील जंगली भागांत ३१ डिसेंबरच्या रात्री होणाºया पार्ट्यांवर वॉच ठेवला जाणार असून, युवा पिढीने नववर्षाचे स्वागत मद्यप्राशनाने न करता मिष्टान्न वाटून करावे, असे आवाहन ठाणेदार रऊफ शेख यांनी केले आहे. आसेगाव परिसर हा जंगली भागाने वेढलेला परिसर असून, अनेक युवक नववर्षाचे स्वागत जंगली भागांत रात्री पार्ट्यांचे आयोजन करून करतात. यावेळी मद्यप्राशन करण्याचा प्रकारही होतो. त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडण्याची भिती असते. यापूर्वी आसेगाव परिसरात अशी घटना घडली नसली, तरी इतर ठिकाणी नववर्षाच्या पार्टीतून गुन्हेगारीच्या घटना घडल्याची उदाहरणे आहेत. याच पृष्ठभूमीवर आसेगाव पोलीस, अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया विविध मार्गावर पोलिसांच्यावतीने वाहनांची तपासणी करण्यात येणार असून, रात्री उशिरापर्यंत पेट्रोलिंग करून परिसरात लक्ष ठेवले जाणार आहे. दरम्यान, युवकांनी नववर्षाचे स्वागत मद्यप्राशन न करता, दूध, मिष्टान्नांचे सेवन करून हर्षोल्हासात नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार रऊफ शेख यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस