शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आसेगाव बांध सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 14:17 IST

आसेगाव बांध सिंचन प्रकल्पातही आजमितीस केवळ ४० टक्के जलसाठा असून मोठा पाऊस होवून प्रकल्प न भरल्यास आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची टंचाई भेडसावणार.

ठळक मुद्देआसेगाव बांध सिंचन प्रकल्पावर आसेगाव परिसरातील शेकडो शेतकरी उपसा सिंचन पद्धतीने पिकांच्या सिंचनासाठी पाणी घेतात.गतवर्षी घटलेले पर्जन्यमान आणि यंदाही तशीच स्थिती उद्भवल्याने आजमितीस प्रकल्पात केवळ ४० टक्के जलसाठा झाला आहे.

रब्बी हंगामात जाणवणार अडचण : मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायमलोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम) : सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिके संकटात सापडली आहेत. यासोबतच सिंचन प्रकल्पांची पाणीपातळी वाढण्याऐवजी घटत चालल्याचे दिसत आहे. परिसरातील आसेगाव बांध सिंचन प्रकल्पातही आजमितीस केवळ ४० टक्के जलसाठा असून मोठा पाऊस होवून प्रकल्प न भरल्यास आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची टंचाई भेडसावणार असल्याचे संकेत मिळत आहेत.आसेगाव बांध सिंचन प्रकल्पावर आसेगाव परिसरातील शेकडो शेतकरी उपसा सिंचन पद्धतीने पिकांच्या सिंचनासाठी पाणी घेतात. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत: तुडूंब भरणे अत्यावश्यक आहे. मात्र, गतवर्षी घटलेले पर्जन्यमान आणि यंदाही तशीच स्थिती उद्भवल्याने आजमितीस प्रकल्पात केवळ ४० टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामात पिकांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न भेडसावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मुग, उडीद ही पिके सुकत चालली आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत मोठा पाऊस झाला नाही खरीपाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, ज्या शेतकºयांकडे पाण्याची सुविधा आहे, त्यांनी सुक्ष्म सिंचन पद्धतीने पिके वाचविण्याची धडपड चालविल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरणWaterपाणी