शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या जनावरांसाठी लोकसहभागातून जंगलात बांधले कृत्रिम पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 16:17 IST

यंदाही मुक्या जिवांची तहान भागावी म्हणून ते जंगलात कृत्रिम पाणवठे उभारण्यासाठी लोकवर्गणी करीत आहेत.

- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रखरखत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी रस्त्यावर सैरावैरा धावताना वाहनाखाली चिरडल्याने दरवर्षी अनेक वन्यप्राणी मृत्यूमुखी पडतात. या गंभीर समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी मंगरुळपीर येथील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम गेल्या चार वर्षांपासून धडपडत असून, यंदाही मुक्या जिवांची तहान भागावी म्हणून ते जंगलात कृत्रिम पाणवठे उभारण्यासाठी लोकवर्गणी करीत आहेत.वाशिम जिल्ह्यात प्रादेशिक वनविभागाच्या अखत्यारित येणाºया जंगलाचे प्रमाण लक्षणीय आहे. या जंगलात प्रामुख्याने, निलगाय, काळविट, हरीण, ससे, रानडुक्कर, माकडे आदिंची संख्या मोठी असली तरी, या जंगलात बिबट, तरस, अस्वल आदि प्राण्यांचाही अधिवास आहे. जंगलात नैसर्गिक जलस्त्रोतांचे प्रमाण नगण्य असून, उन्हाळ्यापूर्वीच ते कोरडे पडतात, तर वनविभागाने तयार केलेले पाणवठेही खूप कमी आहेत. त्यामुळे हे प्राणी पाण्यासाठी शेतशिवार, लोकवस्तीत धाव घेतात. यातून कधी वन्यजीव-मानव संघर्षामुळे, तर कधी रस्ता ओलांडताना वाहनाखाली सापडून त्यांना प्राण गमवावे लागते. जैवविविधतेच्या दृष्टीकोणातून ही बाब गंभीर आहे. हे लक्षात घेऊनच मानद वन्यजीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनात वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मागील चार वर्षांपासून जंगलात लोकसहभागातून कृत्रिम पाणवठे उभारत आहे. यंदाही ते त्यासाठी गावोगाव फिरुन वन्यजीवप्रेमी तथा सामाजिक कार्यकर्त्यांकडे ते लोकवर्गणी करीत आहेत. 

१५ दिवसांत २२ हजारांची रक्कम वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या वनोजा शाखेचे सदस्य चेतन महल्ले, अमर खडसे, शुभम हेकड, उमेश वारेकर,  सौरव इंगोले, सतिश गावंडे,  सतिष राठोड, वैभव गावंडे,  हरिष इंगोले, आदित्य इंगोले आदिंनी यंदा आजवर १५ हजार रुपयांच्यावर, तर कोलार शाखेचे सदस्य संदीप ठाकरे, नंदू सातपुते, विष्णू गावंडे, श्रीकांत डापसे, उमेश जंगले, अतुल डापसे, गौरव पुसदकर, शुभम सावळे, प्रवीण आंबोर, आशिष ठाकरे आणि प्रणव कबाडे यांनी ७ हजार रुपये गोळा केले आहेत. 

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीवMangrulpirमंगरूळपीर