याबाबत दिलेल्या निवेदनात सदर रस्ता हा तीर्थक्षेत्र धोद्राकुंड या देवस्थानाला जोडणारा असून या तीर्थक्षेत्राला श्रावण महिन्यात भाविकांची मोठी वर्दळ व गर्दी सकाळी ४ वाजेपासुन सुरू होते. दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमेला दत्तजयंतीला मोठी यात्रा भरते. सतत सात दिवस येथे भागवत सप्ताह चालतो.हे ऋषिश्वर महाराज यांचे देवस्थान असून देवठाना,आसोला,गव्हा,सोमनाथ नगर, संभाजीनगर, सोमठाणा मानोरा आदीसह परिसरातील भाविकांची सतत वर्दळ असते श्रावण महिन्यात दर सोमवारी(रोठ)महाप्रसाद ग्रामस्थाकडून चालतो. तेव्हा या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करणे गरजेचे असून सदर काम तात्काळ सुरू करा, असे निवेदन परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने दिले. सतत निवेदन-स्मरणपत्र देऊनही आजपर्यंत त्या मंजूर रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही . तेव्हा येत्या आठ दिवसात या रस्ता कामात उचित कार्यवाही न झाल्यास सदर देवस्थानाच्या कुंडात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मनोहर राठोड यांनी दिला आहे.
सोमनाथनगर ते धोद्रा रस्त्याचे काम मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:43 IST