कारंजा लाड (वाशिम) : शहरातील शिक्षक कॉलनीमधील घरातून अज्ञात चोरट्याने एकूण ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १७ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. पोलिस सूत्रांनुसार, प्रशांत बबनराव गावंडे यांच्या घरातील १८ ग्रॅम सोन्याची ३0 हजारांची पोत, अंगठी तसेच कानातील बाळय़ा आणि रोख २१ हजार मिळून एकूण ५९ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. पोलिसांनी भादंविच्या कलम ४५७, ३८0 नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.
कारंजा येथे ५९ हजारांची घरफोडी
By admin | Updated: January 19, 2015 02:23 IST